रेशन कार्डची आपल्याला अनेकदा गरज लागते. विशेषत: गरीब कुटुंबांना याचा अधिक फायदा होतो. तुम्ही रेशन कार्डधारक असाल आणि सरकारकडून दर महिन्याला राबविण्यात येत असलेल्या रेशन योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. लोकांच्या सुविधेसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता रेशन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला लांबच लांब रांगा लावाव्या लागणार नाही किंवा सरकारी कार्यालयातही वारंवार फेरफटका मारावा लागणार नाही. कारण आता लवकरात लवकर रेशन कार्डधारकांचे रेशन कार्ड डिजिटल होणार आहे. जुलै २०२२ पर्यंत प्रत्येकाला डिजिटल रेशन कार्ड मिळेल असे उत्तराखंड सरकारने जाहीर केले आहे. या कार्डामुळे लाभार्थ्यांना धान्य ATM मधून रेशन काढणे असे अनेक फायदे मिळतील.
( हेही वाचा : १ जुलै पासून सरकारी कर्मचाऱ्यांना ३०० ऐवजी ४५० सुट्ट्या?)
रेशन कार्ड डिजिटल करण्याची योजना २०२० मध्ये सुरू झाली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भामुळे ही योजना पूर्ण होऊ होऊ शकली नाही. त्यामुळे डिजिटल रेशन कार्ड करण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळाली असून मे २०२२ पर्यंत १२ लाख ५८ हजार ५४४ रेशन कार्डधारकांना डिजिटल रेशन कार्ड वितरित करण्यात आले आहे.
डिजिटल रेशन कार्ड म्हणजे काय?
रेशन कार्डचा युनिक क्रमांक संपूर्ण देशातील ग्राहकांना एकच असेल. यामुळे रेशन धारकांना कधी धान्य घेतले, अजून किती रेशन घेणे बाकी आहे याची संपूर्ण माहिती ऑनलाईन मिळणार आहे.
धान्य ATM मधून काढता येणार रेशन
अन्न व नागरी मंत्री रेखा आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र लोकांना रेशन घेण्यासाठी दुकानात जावे लागणार नाही. ज्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती गरजेच्यावेळी एटीएममधून पैसे काढते त्याप्रमाणे आता पात्र लोकांनाही सोयीनुसार धान्य घेता येणार आहे असे सांगितले आहे. पायलट प्रकल्प म्हणून उत्तराखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे.