म्युकरमायकोसीसच्या विरोधात लढण्यासाठी भारत सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे औषध वाटप अपेक्षित पुरवठ्यानुसार दिनांक 10 मे ते 31 मे 2021 पर्यंत उपलब्ध केले जाईल.

128

देशातील काही राज्यांमध्ये, अ‍ॅम्फोटेरिसिन बी या औषधाच्या मागणीत अचानक वाढ दिसून आली आहे. हे औषध म्युकरमायकोसीस या आजाराने ग्रस्त रुग्णांना, डॉक्टरांकडून सूचित केले जात आहे. या कारणास्तव भारत सरकार या औषध उत्पादकांसोबत त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी बोलणी करत आहे. या औषधाची अतिरिक्त आयात करुन तसेच स्थानिक उत्पादनात वाढ करत पुरवठ्याच्या स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. अशी माहिती भारत सरकारच्या खते व रसायन मंत्रालयाने दिली आहे.

वाटपासाठी यंत्रणा तयार करण्याच्या राज्यांना सूचना

उत्पादक किंवा आयातदार यांच्याकडे असलेल्या शिल्लक साठ्याच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि अ‍ॅम्फोटेरिसिन बी या औषधाची मागणी पाहिल्यानंतर, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे औषध वाटप अपेक्षित पुरवठ्यानुसार दिनांक 10 मे ते 31 मे 2021 पर्यंत उपलब्ध केले जाईल. सरकारी, खाजगी रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांमधून समान प्रमाणात पुरवठ्याचे वितरण करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याची विनंती राज्यांना करण्यात आली आहे. या वाटपातील औषध मिळवण्यासाठी खाजगी आणि शासकीय रुग्णालयांतून, संपर्क रुग्णांच्या सोयीसाठी सार्वजनिकपणे जाहीर करण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत.

(हेही वाचाः अखेर १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरण मोहिमेला स्थगिती! )

भारत सरकारचे प्रयत्न

या व्यतिरिक्त यापूर्वी पुरवठा केला गेलेला साठा आणि उपलब्ध असलेला साठा यांचा काटेकोरपणे वापर करावा अशीही विनंती राज्यांना करण्यात आली आहे. राष्ट्रीय औषध मूल्यांकन प्राधिकरण(नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटी, एनपीपीए) यांच्याद्वारे पुरवठ्याच्या व्यवस्थेचे परीक्षण केले जाईल. संपूर्ण देश महामारीच्या तीव्र लाटेतून जात आहे आणि त्याचा परिणाम देशाच्या विविध भागांवर झाला आहे. भारत सरकार, आवश्यक अशा कोविड औषधांच्या पुरवठ्यात वाढ करण्यासाठी तसेच तो राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करुन देण्याच्या कार्यासाठी अविरतपणे झटत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.