डीपफेकबाबत सरकार नवीन नियम आणत आहे. चुकीची माहिती आणि डीपफेकबाबत नवीन आयटी नियमांमध्ये मोठ्या तरतुदी आहेत. त्याचे पालन सर्वांनी करणे बंधनकारक आहे, अन्यथा कारवाई केली जाईल. (Deepfake New Rule) नवीन IT नियम 7-8 दिवसात अधिसूचित केले जातील, अशी घोषणा केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी 16 जानेवारी रोजी केली आहे. याविषयी 2 बैठकाही झाल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Gopichand Padalkar : लोकांच्यात बाजार मांडून साध्य काय करणार; गोपीचंद पडळकर यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा)
नियमांच्या उल्लंघनाची माहिती मिळण्यासाठी प्लॅटफॉर्म बनवणार
चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (Ministry of Electronics and Information Technology, MEIT) एक व्यासपीठ तयार करेल. त्यावर वापरकर्ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आयटी नियमांच्या उल्लंघनाबद्दल माहिती देऊ शकतील. एमईआयटी वापरकर्त्यांना आयटी नियमांच्या उल्लंघनाबद्दल अगदी सहजपणे माहिती देण्यात आणि एफआयआर नोंदविण्यात मदत करेल.
आयटी नियमांच्या उल्लंघनासाठी शून्य सहिष्णुता
“आजपासून आयटी नियमांच्या उल्लंघनासाठी शून्य सहिष्णुता असेल. मध्यस्थाविरुद्ध एफआयआर नोंदवला जाईल. जर त्यांनी मजकूर कोठून आला आहे, याची माहिती दिली, तर ज्याने मजकूर शेअर केला, त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार बदल करण्यासाठी सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे”, असे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले.
(हेही वाचा – Bharat Gaurav Tourist Train : २०२३ मध्ये ‘भारत गौरव’ रेल्वेगाड्यांनी 96 हजार पर्यटकांनी केले पर्यटन)
अनेकांनी व्यक्त केली चिंता
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यापूर्वीच ‘डीपफेक लोकशाहीसाठी नवा धोका म्हणून समोर आला आहे’ असे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही डीपफेकवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचा एक डीपफेक व्हिडिओ समोर आला होता. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचेही डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. (Deepfake New Rule)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community