५ लाख गरजूंचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार! सरकार राबवणार ‘अमृत महाआवास अभियान’

120

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महाआवास अभियान पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 24 नोव्हेंबर, 2022 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर ऑडिटोरिअम, मुंबई येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ या अभियानामुळे 5 लाख गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

( हेही वाचा : ठाणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना होणार निवड, मिळेल ६० हजारांपर्यंत पगार)

‘अमृत महाआवास अभियान 2022-23’

‘सर्वांसाठी घरे-2024’ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची गतीने प्रभावी अंमलबजावणी करणे व कामात गुणवत्ता आणणे हा या अभियानाचा हेतू आहे.

प्रमुख १० उपक्रम

  1. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे
  2. घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे.
  3. मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरीत करणे.
  4. सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे.
  5. प्रलंबित घरकुले (Delayed Houses) पूर्ण करणे.
  6. ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे.
  7. इंदिरा आवास योजनेंतर्गत उर्वरित सर्व घरकुले पूर्ण करणे व क्षेत्र अधिकारी ॲप वापरणे.
  8. सामाजिक लेखापरीक्षण वेळेत करणे.
  9. शासकीय योजनांशी कृतीसंगम (Convergence) करणे.
  10. नावीन्यपूर्ण उपक्रम (Innovations / Best Practices) राबविणे.

असे 10 उपक्रम राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.