Naxalism : नक्षलवादाविरोधात सरकारचे मोठे पाऊल; गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

160
Naxalism : नक्षलवादाविरोधात सरकारचे मोठे पाऊल; गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा
Naxalism : नक्षलवादाविरोधात सरकारचे मोठे पाऊल; गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

येत्या 2 वर्षांत देशातून नक्षलवादी हिंसाचाराचा पूर्णपणे नायनाट केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. (Naxalism) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत नक्षलवादी हिंसाचाराशी झगडणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सचिव NSA अजित डोवाल यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन उपस्थित होते. तसेच केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, केंद्रीय गृहसचिव, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे महासंचालक (CAPF), केंद्र सरकारचे सचिव, राज्यांचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी हेही उपस्थित होते. (Naxalism)

(हेही वाचा – D. Y. Chandrachud : २० वर्षांत महिला न्यायाधीशांची संख्या वाढेल, सरन्यायाधीशांनी दिली आनंदाची बातमी)

”डाव्या आतंकवादाविषयीच्या शून्य सहिष्णुतेच्या धोरणामुळे 2022 मध्ये गेल्या 4 दशकांतील सर्वात कमी हिंसाचार आणि सर्वात कमी मृत्यू झाले. 2014 ते 2023 दरम्यान, नक्षलवादी हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये 52 टक्के घट झाली आहे”, असे गृहमंत्री म्हणाले. हिंसाचारात घट झाल्यामुळे नागरिकांच्या मृत्यूमध्ये 68 टक्के आणि सुरक्षा दलांच्या मृत्यूंमध्ये 74 टक्के घट झाली आहे. (Naxalism)

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, 2019 सालापासून नक्षलवाद्यांचे क्षेत्र झपाट्याने कमी झाले आहे. नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी केंद्रीय दलाच्या १९५ नवीन छावण्या तयार करण्यात आल्या आहेत, यावरून हे समजू शकते. अशा आणखी ४४ छावण्या बांधल्या जातील. त्यातून नक्षलवाद्यांविरुद्ध निर्णायक लढाई लढली जाईल. नक्षलवादी हिंसाचाराने प्रभावित भागात, तसेच नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आलेल्या भागात नक्षलवादी पुन्हा फोफावू नयेत, यासाठी कडक देखरेख ठेवण्याची गरज आहे. (Naxalism)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.