नेते बना, नेतेगिरी करु नका; राज्यपालांचा युवकांना सल्ला

96

काही लोकांमध्ये नेतृत्वगुण उपजत असतात. इतरांनी नेतृत्वगुण प्रयत्नपूर्वक बाणवले पाहिजेत. युवकांनी नेते अवश्य बनावे  परंतु नेतेगिरी करु नये, असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी युवकांना दिला.

विविध जिल्ह्यांमधून आलेल्या युवकांच्या केंद्रीय व राज्यस्तरीय अभिरुप मंत्रिपरिषद सदस्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची गुरुवारी राजभवन येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले, एक वाईट सैनिक चांगला सेनानी कधीही होऊ शकत नाही. यास्तव चांगला नेता होण्यासाठी प्रथम चांगले अनुयायी झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

युवकांनी शेतकऱ्यांशी संवाद साधावा

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, त्यावेळी वाईट वाटते. युवा सदस्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना जगण्याची उमेद दिली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

(हेही वाचा ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश देण्यास विरोध)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.