अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर यांचे मंदिर उभारण्यात आल्यानंतर आता श्रीरामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज (Govind Dev Giri Maharaj) यांनी ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमी मंदिर मुसलमानांनी हिंदूंना द्यावी, तर आम्ही अन्य मंदिरांकडे दुर्लक्ष करू, असे आवाहन केले आहे. आम्हाला भूतकाळात नाही तर भविष्यात जगायचे आहे, असे म्हटले आहे.
(हेही वाचा Shashi Tharoor : केरळचा उदोउदो करण्याच्या नादात शशी थरूर यांचा खोटारडेपणा उघड; नेटकऱ्यांनी केले ट्रोल )
काय म्हणाले गोविंददेव गिरी महाराज?
मी मुस्लिमांना हात जोडून आवाहन करतो की, त्यांनी ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमी हिंदूंच्या ताब्यात द्यावी. हे हल्लेखोरांनी तोडले होते. परकीय हल्ल्यात 3500 हिंदू मंदिरे उद्ध्वस्त झाली. हे आपल्यावरचे सर्वात मोठे डाग आहेत. लोक दुःखी आहेत. त्यांनी बंधुभावाने हे दुःख संपवले तर बंधुभाव वाढण्यास मदत होईल, असे गोविंददेव गिरी महाराज म्हणाले. राम मंदिरावर आम्ही शांततापूर्ण तोडगा काढला आहे. आता असे युग सुरू झाले आहे, आम्हाला आशा आहे की इतर प्रश्नही शांततेने सोडवले जातील. उर्वरित दोन मंदिरांवर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी मुस्लिम समाजातील लोक तयार आहेत पण काही लोकांचा विरोध आहे, असे गोविंददेव गिरी महाराज (Govind Dev Giri Maharaj) म्हणाले.
Join Our WhatsApp Community