काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराबाबत आम्ही आग्रही असून दोन्ही मंदिरे पूजा करण्यासाठी उपलब्ध करावीत. ज्याप्रमाणे शांततेत अयोध्येत श्रीराम मंदिर झालं, त्याचप्रमाणे ज्ञानवापीबाबत पक्षकार मुस्लिम बांधवांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि मशीद दुसरीकडे करावी, असे आवाहन राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज (Govindgiri Maharaj) यांनी केले आहे.
(हेही वाचा – Mufti Salman Azhari : मौलाना मुफ्ती सलमान अजहरीला रातोरात गुजरातमध्ये हलवले; घाटकोपरमध्ये तणावपूर्व शांतता)
काशी आणि मथुरा या ठिकाणीही भव्य मंदिर उभारण्याचा मार्ग लवकरच मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आळंदीमध्ये गोविंदगिरी महाराज यांच्या पंचाहत्तराव्या जन्मदिवसाचे औचित्य साधत गीता भक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सत्ताधारी-विरोधकांची टोळी सक्रिय; जरांगे-पाटील यांचा आरोप)
गोविंदगिरी महाराज म्हणाले की,
प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा शांतीपूर्ण झाला आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली याचा आनंद आहे. आता आमचा आग्रह आहे की, काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर हे देखील पूजा करण्यासाठी उपलब्ध व्हावं. यासाठी आता अनुकूल वातावरण तयार होत आहे. इतिहास साक्षी आहे. काशी विश्वनाथचा जो मुख्य नंदी आहे, त्याचं तोंड मशीदीकडे आहे. नंदीचं तोंड हे केवळ महादेवाकडे असतं. याचा अर्थ आहे की त्याठिकाणी महादेवाचं वास्तव्य होतं. आजही काही अवशेष आहेत. हे पाहता आमच्या मुस्लिम बांधवांनी मोठं मन करून हे म्हणलं पाहिजे की काही हरकत नाही. या आणि पूजा करा. मशीद दुसरीकडे होऊ शकते. हे काम आपण शांततेत आणि बंधुत्व भावातून केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी या निमित्ताने केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community