जीबीएस आजाराबाबत सरकार सतर्क; सार्वजनिक आरोग्य मंत्री Prakash Abitkar यांचे प्रतिपादन

55
जीबीएस आजाराबाबत सरकार सतर्क; सार्वजनिक आरोग्य मंत्री Prakash Abitkar यांचे प्रतिपादन
  • प्रतिनिधी

पुण्यात जीबीएस (गुइलेन-बार्रे सिंड्रोम) या आजाराचे १११ संशयित रुग्ण आढळल्याने राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी मंगळवारी या विषयावर चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला. प्रकाश आबिटकर म्हणाले की, “जीबीएस हा आजार नवीन नाही. अनेक वर्षांपासून हा आजार अस्तित्वात आहे. मात्र, पुण्यात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे हा मुद्दा आता समोर आला आहे. पाण्यातून हा आजार होतो असल्याचे कळते आहे. त्यामुळे जलप्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे.”

(हेही वाचा – स्वातंत्र्य चळवळीतील धाडसी नेतृत्व पंजाब केसरी Lala Lajpat Rai)

या आजाराचा सामना करण्यासाठी प्रशासनाने जिल्हा रुग्णालयांमध्ये विशेष तयारी केली आहे. रुग्णांवर उपचारासाठी सर्व औषधे उपलब्ध करून दिली आहेत. “रुग्णांना सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील, आणि गरजू रुग्णांना चार लाखांपर्यंतची आर्थिक मदत देण्याची सरकारची योजना आहे,” असे आबिटकर (Prakash Abitkar) यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Smriti Mandhana : स्मृती मानधना आयसीसीची सर्वोत्तम महिला एकदिवसीय खेळाडू)

जीबीएस आजाराच्या नियंत्रणासाठी राज्यातील सर्व रुग्णालयांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. “पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाण्याच्या स्वच्छ वापरासाठी नागरिकांना जबाबदारीचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे,” असेही त्यांनी नमूद केले. “रुग्णसंख्या वाढल्याने आम्ही जास्त काळजी घेत आहोत. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे,” असे आश्वासनही आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.