कोरोनाच्या तिस-या लाटेने देशात धडक दिली आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. त्यात ज्या कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे, त्याचा आढावा सरकारकडून घेतला जात आहे. सरकारी विश्लेषणातून असे समोर आले आहे की, ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यात 76 टक्के रुग्ण हे लसीकरण न झालेले होते.
काय सांगतय विश्लेषण ?
दिल्ली सरकारने हे विश्लेषण 5 ते 9 जानेवारी दरम्यान मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या आधारावर केले. या दरम्यान मृत्यू पावलेल्या रुग्णांतील 46 पैकी 35 मृत्यू हे लसीकरण न झालेल्या व्यक्तींचे होते. लसीकरण केल्याने मृत्यूचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. तसेच सहव्याधी ग्रस्त लोकांवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे या विश्लेषणातून समोर आले आहे. यावेळी होणारे मृत्यू हे केवळ कोरोनामुळेच होत आहेत हे म्हणणे चुकीचे आहे. हे मृत्यू बहूतांशी सहव्याधी असलेल्या लोकांचे झाले आहेत, असे राजीव गांधी सूपर स्पेशालिटी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक बी.एल. शेरवाल यांनी सांगितले आहे.
( हेही वाचा :कहरच ना राव! कर्ज दिलं नाही म्हणून पठ्यानं चक्क बँकच पेटवली )
सरकार सज्ज
पहिल्या आणि दुस-या लाटेदरम्यान ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे प्रशासनाने ऑक्सीजनची पुरेशी व्यवस्था केली आहे. तसेच या तिस-या लाटेशी सामना करण्यासाठी औषधांचा योग्य साठादेखील सरकारकडून करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community