EPFO Interest Rate: PF च्या व्याजदरात 43 वर्षांतील सर्वात मोठी घसरण

154

केंद्र सरकारकडून पीएफच्या दरांत कपात करण्यात आली आहे. भविष्य निर्वाह निधी(EPFO)कडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. PFचा दर आता 8.5 टक्क्यांवरुन आता 8.1 टक्के झाला आहे. पीएफचा हा व्याजदर गेल्या चार दशकांतील सर्वात कमी व्याजदर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नोकरदार वर्गाला निवृत्तीनंतरच्या भविष्याची चिंता लागली आहे.

पीएफच्या व्याजदरात घसरण

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच पीएफचे व्याज ग्राहकांच्या खात्यात जमा होणार आहे. हा दर कमी असल्यामुळे 2021-22 च्या आर्थिक वर्षातील व्याज डिसेंबरच्या आधीच खात्यात जमा करण्याचा विचार करण्यात येत आहे. गेल्या 43 वर्षांत पहिल्यांदाच पीएफचा दर इतका कमी झाल्याचे बोलले जात आहे. 1977-78 साली पीएफचा व्याजदर कमी होता. 2020-21 या आर्थिक वर्षात हा व्याजदर 8.5 टक्के करण्यात आला होता.

(हेही वाचाः EPFO: या चुका झाल्या तर तुमचे PF अकाऊंट बंद होऊ शकते)

कसा ठरतो व्याजदर?

पीएफ खातेधारकांच्या खात्यातील रक्कम EPFOकडून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवली जाते. या गुंतवणुकीतून होणा-या कमाईचा एक हिस्सा व्याजाच्या रुपाने खातेधारकांना दिला जातो. EPFO कडून 85 टक्के रक्कम Debt Fund च्या स्वरुपात गुंतवण्यात येते. यामध्ये सरकारी बाँड आणि सिक्युरिटीचा देखील समावेश आहे. उरलेली 15 टक्के रक्कम ही Equity Fund च्या स्वरुपात गुंतवण्यात येते. याद्वारे मिळणा-या उत्पन्नाच्या आधारे पीएफवरील व्याजदर केंद्र सरकारकडून ठरवण्यात येतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.