Ethanol Production: साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी इथेनॉलच्या निर्मितीवर बंदी

217
Ethanol Production: साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी इथेनॉलच्या निर्मितीवर बंदी
Ethanol Production: साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी इथेनॉलच्या निर्मितीवर बंदी

इथेनॉल निर्मितीसाठी(Ethanol Production) उसाचे रस वापरण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. महाराष्ट्र, कर्नाटकासह अनेक राज्यात यंदा उसाचे उत्पादन घटणार असल्याने संभाव्य दरवाढीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

सरकारने घोषणा करत ऊसाच्या रसापासून इथेनॉल वर बंदी घालण्याचे  कारण की, भारतात कमी पावसामुळे उसाचे उत्पादन कमी झाले आहे.अशा परिस्थितीत सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी साखर महागण्याची भीती आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशात साखरेच्या पुरेशा सरकारचे लक्ष आहे. (Ethanol Production)

(हेही वाचा : Modi Govt: कांदा आणि साखरेचे भाव कमी होणार, नववर्षापूर्वी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
देशात गेल्या पाच-सहा वर्षात ऊसाचे क्षेत्र वाढून साखर उत्पादन वाढले होते. निर्यातीवरही बंधने घातल्याने साखरेचा उठाव होत नव्हता. त्यातून गोडावूनमध्ये ते पडून राहिल्याने कारखाने अडचणीत येऊ लागले. त्यातून साखर उत्पादनाला मर्यादा घालण्यासाठी इथेनॉल निर्मितीसाठी रसाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी ३२० लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले. ४० लाख मे. टन साखर निर्मितीचा रस इथेनॉलकडे वळविण्यात आला. इथेनॉलला चांगला दर मिळाल्याने कारखाने आणि शेतकाऱ्यांचाही फायदा झाला. (Ethanol Production)

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.