मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Expressway) चौपदरीकरणाच्या कामाचे घोंगडे मागील १२ वर्षांपासून भिजत पडले आहे. या कामासाठी आजवर अनेक डेड लाईन दिल्या गेल्या, पण अद्याप या महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. आता राज्य सरकारने या चौपदरीकरणाच्या कामासाठी नवीन डेडलाईन दिली आहे. त्यामुळे या चौपदरीकरांच्या रस्त्याचा अनुभव घेण्यासाठी कोकणवासीयांची प्रतीक्षा वाढणार आहे.
सरकारला आश्वासन पूर्ण करता आले नाही
वर्ष 2023 अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण (Mumbai Goa Expressway) पूर्ण होण्याची घोषणा सरकारने याआधी केली होती. मात्र सरकारला हे आश्वासन पूर्ण करता आले नाही. आता मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी नवीन डेडलाईन सरकारने दिली आहे. 31 डिसेंबर 2024 ही नवीन डेडलाईन सरकारने ठरवली आहे. उच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान सरकारने ही माहिती दिली. त्यामुळे कोकणवासियांचा यंदाचाही प्रवास खड्ड्यातूनच होणार आहे. प्रकल्पाला होणाऱ्या विलंबामुळे वाढणारा खर्च हा जनतेचाच पैसा असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान केली.
(हेही वाचा Central Railway : रेल्वे स्थानकात अस्वच्छता कराल तर खैर नाही; किती होणार दंड? जाणून घ्या…)
वर्ष 2011 ला पूर्ण होणारा प्रकल्प अद्याप प्रलंबित
मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Expressway) दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर बुधवार, ३ जानेवारी रोजी सुनावणी झाली. जवळपास 12 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, कोकणवासियांचे हाल संपण्याची चिन्ह नाहीत. डिसेंबर 2023 चा मुहूर्त हुकल्याची प्रशासनाने न्यायालयात कबुली दिली. वर्ष 2011 ला पूर्ण होणारा प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे.
Join Our WhatsApp Community