पदवीधर लिपिकांना मिळणार नाही अतिरिक्त वेतनवाढ

125

मुंबई महापालिकेतील पदवीधर लिपिकांना देण्यात येणारी अतिरिक्त वेतनवाढ रद्द करण्याचा विचार प्रशासनाचा असून लवकरच सर्व प्रकारच्या मान्यतेने ही अतिरिक्त वेतनवाढ कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. लेखापाल विभाग सामान्य प्रशासन विभाग यांच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय झाल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा : सॅटलाईट टॅगिंग करुन समुद्री कासवांचा भ्रमणमार्ग जाणून घेण्यासाठी काय अडथळे येतात, जाणून घ्या)

अतिरिक्त वेतन या पुढे न देण्याचा निर्णय 

मुंबई महापालिकेत यापूर्वी लिपिक पदाच्या भरतीत पदवीपर्यंतचे शिक्षण बंधनकारक नव्हते. त्यामुळे लिपिक पदावर लागलेल्या कर्मचाऱ्याने आपले पदवीपर्यत शिक्षण पूर्ण केल्यास त्यांना स्थायी समिती व महापालिकेच्या एप्रिल १९६९ च्या ठरावानुसार एक अतिरिक्त वेतनवाढ देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे दहावी च्या पुढील पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या लिपिकांना एक अतिरिक्त वेतन दिले जायचे. परंतु हे अतिरिक्त वेतन या पुढे न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

वेतनवाढ देण्याचा ठराव रद्द

बदलत्या परिस्थितीनुसार पदवीधर उमेदवारांची उपलब्धता वाढत असल्याने सुधारित अर्हतांमध्ये उमेदवारांच्या शालांत परीक्षेतील टक्केवारीखेरीज अन्य कोणत्याही उच्च शैक्षणीक अर्हता असाव्यात अशी अपेक्षा ठेवत आली नाही. परंतु दिसन २००८ मध्ये केलेल्या लिपिकांच्या भरतीत शैक्षणिक अर्हता गृहीत धरून सुधारित केली होती. त्यामुळे च्या सुधारित अर्हतांमुळे प्रशासनाने सन २००८ पासून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे अतिरिक वेतनवाढ विचारात घेतलेल्या नाहीत. पदवीधर लिपिकांना तारकुंडे अहवालानुसार अतिरिक्त वेतनवाढी देण्याबाबतचा ठराव रद्द करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात प्रशासन असल्याची माहिती मिळत आहे. सन २००८ च्या प्रभावाने अतिरिक वेतनवाढ देण्याचा ठराव रद्द करण्यात येत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.