Gram Panchayat Election खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार; राज्य निवडणूक आयोगाची माहिती

विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती.

139
Gram Panchayat Election खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार; राज्य निवडणूक आयोगाची माहिती
Gram Panchayat Election खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार; राज्य निवडणूक आयोगाची माहिती

ग्रामपंचायत निवडणुकीतील सर्व उमेदवार ट्रू व्होटर ॲपबरोबरच (True Voter App) आता पारंपरिक पद्धतीनेदेखील (ऑफलाइन) निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करू शकतात, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (१ डिसेंबर) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. (Gram Panchayat Election)

विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकांचा निकाल ६ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी ६ डिसेंबर २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे. नक्षलग्रस्त, दुर्गम भागात मात्र ७ नोव्हेंबर २०२३ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे तेथील बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी ७ डिसेंबर २०२३ पर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. (Gram Panchayat Election)

(हेही वाचा – PM Modi In COP28 : पुढील आंतरराष्ट्रीय हवामान बदल परिषदेसाठी भारत देणार मोठे योगदान; पंतप्रधान मोदी यांनी ठेवला ‘हा’ प्रस्ताव)

सर्व उमेदवारांना ट्रू व्होटर ॲपद्वारे (True Voter App) निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता ज्यांना ट्रू व्होटर ॲपद्वारे (True Voter App) निवडणूक दाखल करणे शक्य नाही, त्यांना पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने देखील निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करता येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. (Gram Panchayat Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.