१२ एप्रिल २०२५ या पवित्र दिवशी, हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) निमित्ताने महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात स्थित समर्थ रामदास स्वामीजींच्या तपोभूमीत सज्जनगड येथे एक भव्य व भक्तिमय धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या विशेष प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माननीय आलोक कुमार यांचे सज्जनगड येथे आगमन झाले.
आलोक कुमार यांची संत दर्शन यात्रा ९ एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्रात प्रारंभ झाली होती. या यात्रेदरम्यान त्यांनी नाशिक, त्र्यंबकेश्वर, कोपरगाव, पैठण, पंढरपूर, कोल्हापूर येथील कणेरी मठ, सांगली आणि सातारा येथील विविध संत, महंत, मठाधीश व संत परंपरेचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. या भेटींत राष्ट्रनिर्माण, आध्यात्मिक जागृती, आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा प्रचार याविषयी विचारमंथन करण्यात आले. सज्जनगड येथे आगमनाच्या वेळी, समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे प्रमुख भूषण स्वामी रामदासीजी यांनी आलोक कुमार यांचे अत्यंत आत्मीयतेने स्वागत केले. या मंगलप्रसंगी विविध मठांचे साधू-संत, ब्रह्मचारी, स्थानिक श्रद्धावान भक्तगण, तसेच विश्व हिंदू परिषदेचे अनेक पदाधिकारी आणि सेवाव्रती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(हेही वाचा २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी; अजमेर पोलिसांनी Bangladeshi infiltrators मोहम्मद शाहिदला केली अटक)
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आलोक कुमार यांनी हनुमानजींचे (Hanuman Jayanti) चरित्र आणि त्यांचे समर्पण, निर्भयता, ब्रह्मचर्य, सेवा वृत्ती आणि पराक्रम या गुणांचे स्मरण करून दिले. त्यांनी म्हटले की, “आजचा युवक जर हनुमानजींच्या गुणांचे अनुकरण करील, तर भारत पुन्हा एकदा परम वैभवशाली राष्ट्र बनेल.” तसेच, त्यांनी समर्थ रामदास स्वामीजींनी भारतभर ११०० हनुमान मंदिरे आणि मठांची स्थापना कशी केली, यावर प्रकाश टाकला. ही मंदिरे केवळ पूजास्थळे नव्हती, तर ती राष्ट्रचिंतन, सैनिकी प्रशिक्षण, संत प्रेरणा आणि सामाजिक संघटनाचे केंद्र होती. त्यांनी उदाहरण दिले की, “छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून रायगडावर परतले, त्यावेळी समर्थ रामदास स्वामीजींनी स्थापलेल्या हनुमान मंदिरांमध्ये रणनीती ठरवणे, विश्रांती घेणे व संवादाचे केंद्र म्हणून उपयोग केला गेला. अशा प्रकारे, या मंदिरांनी स्वराज्य निर्मितीत मोलाचा वाटा उचलला., असे ते म्हणाले. कार्यक्रमाचा समारोप सामूहिकरित्या हनुमान चालीसा पठण आणि राष्ट्रहितासाठी प्रार्थना करून झाला. या दिवशी संपूर्ण सज्जनगड परिसर भक्तिभावाने आणि राष्ट्रप्रेरणांनी भारावलेला दिसून आला.
या (Hanuman Jayanti) कार्यक्रमाला महाराष्ट्र व गोवा राज्य धार्मिक विभाग प्रमुख अतुल शालगर, विश्व हिंदू परिषद सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजय मुद्राळे, सातारा जिल्हा मंत्री विजय गाढवे, सातारा जिल्हा सहमंत्री दीपक दीक्षित, प्रांत धर्माचार्य संपर्क सहप्रमुख नागनाथ बोनगरगे, प्रांत धर्मप्रसार सहप्रमुख संजय कुलकर्णी, प्रमुख समर्थ सेवा मंडळ सज्जनगड योगेश बुवा रामदासी प्रांत व जिल्हा पातळीवरील विश्व हिंदू परिषदेचे विविध पदाधिकारी, सेवाव्रती कार्यकर्ते आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community