वंचित आदिवासी आणि बेघरांनी साजरी केली दिवाळी

71

ग्रँड मराठा फाउंडेशन (जीएमएफ) ही एक स्वयंसेवी संघटना असून ती महाराष्ट्रात सामाजिक कार्याकरिता ओळखली जाते. यंदा या संघटनेच्या वतीने भिवंडी व कर्जतमधील वंचित आदिवासी समुदाय तसेच मुंबई व ठाण्यामधील बेघर आणि कचरा वेचणाऱ्या व्यक्तींसोबत दिवाळीचा जल्लोष साजरा करण्यात आला.

हजाराहून अधिक लाभार्थींना मिळाला लाभ

जीएमएफतर्फे ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवाळीचा फराळ, कपडे, उबदार कपडे, ब्लँकेट, चादरी, पादत्राणे, सुका शिधा आणि खाऊ यांचे वाटप करण्यात आले. याचा लाभ वंचित घटकातील लोकांच्या वस्त्या तसेच लक्ष्य-आधारित परिसरातील हजाराहून अधिक लाभार्थींना मिळाला आहे. उपक्रमाचे नियोजन जीएमएफच्या विश्वस्त माधवी शेलटकर आणि जीएमएफचे संस्थापक रोहित शेलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमाच्या वाटप कार्यक्रमाला ग्रँड मराठा फाउंडेशनच्या स्वयंसेवकांचे पाठबळ लाभले.

(हेही वाचा -गुरुग्राम नमाज वाद: मुंबईच्या वाटेवर हरियाणा ?)

वंचित घटकाचे सबलीकरण हा हेतू

याप्रसंगी बोलताना सिने निर्माता आणि ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक रोहित शेलटकर म्हणाले की, “विविध उपक्रमांद्वारे वंचित घटकाचे सबळीकरण करणे हे ग्रँड मराठा फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाद्वारे मुंबई, ठाणे, भिवंडी आणि कर्जतमधील वंचित, बेघर आणि कचरा वेचणाऱ्या समुदायातील व्यक्तींनी इतरांप्रमाणेच या सणाचा आनंद लुटावा हा आमचा प्रयत्न आहे.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.