कसारा जवळ रेल्वेच्या रुळाखाली असलेली खडी धसल्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला असून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ही उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रशासनाच्या वतीने तातडीने या ठिकाणी काम सुरू केले आहे.
मध्य रेल्वेच्या अप मार्गावर कसारा ते उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाखालील खडी धसली आहे. यामुळे रेल्वे रुळांची उंची कमी जास्त झाली. म्हणून कसाराहून मुंबई सीएसटी मार्गाकडे जाणारी रेल्वे वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरी, घोटी, लहावीत रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. हा खड्डा भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. यामुळे अप मार्गाची वाहतूक एक तास उशिराने सुरू असून लोकल धिम्यागतीने सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
(हेही वाचा – मुंबईचे रस्ते धुणार पाण्याने)
Join Our WhatsApp Community