छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला होता, ती वाघनखे (Wagh Nakh) साताऱ्यात दाखल झाली आहेत. व्हिक्टोरिया म्युझियम, लंडन येथून आलेली ही नखे महाराष्ट्र शासनाद्वारे सतत पाठपुरावा करीत तीन वर्षांकरिता भारतात आलेली आहेत. यानिमित्त करोडों शिवप्रेमी आनंदीत आहेत. या वाघनखांना भारतात आणण्यासाठी केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांचे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्याचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी अभिनंदन केले आहे.
(हेही वाचा 14 मुसलमानांची Ghar vapasi; मंदिरात झाले शुद्धीकरण)
ही केवळ वाघनखे (Wagh Nakh) नाहीत तर छत्रपतींनी केलेल्या अद्वितीय पराक्रम आणि शौर्याचे प्रतीक आहे, ज्या वाघनखांनी तुळजापूरच्या भवानीमातेचे मंदिर तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाचे मंदिर तोडणाऱ्या अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे समस्त हिंदू समाजासाठी गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारी आहेत. या वाघनखांना (Wagh Nakh) भारतात आणण्यासाठी केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांचे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्याचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी अभिनंदन केले आहे आणि महाराष्ट्र शासनाने ही वाघनखे केवळ तीन वर्षांकरताच नाही तर कायम कसे भारतात राहतील याचे प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली, तसेच शिवरायांची वाघनखे जिथे जिथे नेण्यात येतील तिथे समस्त शिवप्रेमींनी त्याचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.
Join Our WhatsApp Community