पर्यावरणीय कायद्यांचे सर्रास उल्लंघन
तक्रारी असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
ठाणे महानगरपालिका (TMC), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), महाराष्ट्र तटीय झोन व्यवस्थापन प्राधिकरण (MCZMA) आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC) यांना यापूर्वीच कायदेशीर नोटीस, छायाचित्रे आणि तक्रारी सादर करण्यात आल्या होत्या. तथापि, कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
NGT च्या नोटीसनंतर अॅड. वैभव साटम यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून महापालिकेने कोणती कृती करावी, याविषयी काही मुद्दे सुचवले आहेत. त्यामध्ये गैरकायदेशीर कचरा टाकण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी. जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी आणि दंडात्मक उपाययोजना कराव्यात. पर्यावरण संरक्षण कायद्यांनुसार भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. महापालिकेने (TMC) या संदर्भात झालेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करावा. कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी अॅड. वैभव साटम यांनी केली आहे. NGT च्या हस्तक्षेपामुळे महापालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवली जाईल आणि ठाणे शहरातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील.
Join Our WhatsApp Community