अखिल भारत हिंदु महासभा मुंबईच्या वतीने वीर हुतात्मा बाबू गेनू (Babu Gainu) यांच्या बलीदान दिनानिमित्त १२ डिसेंबर या दिवशी मुंबईतील परळ येथील कामगार मैदानात पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी हिंदु महासभेचे दिनेशजी भोगले, हरिश शेलार, प्रवीण गर्जे, अलका साटेलकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वदेशीसाठी बलीदान देणारे बाबू गेनू
बाबू गेनू यांनी इंग्रजांच्या विदेशी मालाला विरोध करत स्वदेशीचा पुरस्कार केला. स्वदेशीचे समर्थन म्हणून इंग्रजांनी विदेशी मालाचा आणलेला ट्रक रस्त्यावर चालत असतांना वीर बाबू गेनू यांनी आपले बलीदान दिले. स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मा बाबू गेनू यांचे भरीव योगदान अविस्मरणीय आहे. देशातील सर्व तरुणांना त्यांच्या देशभक्तीची जाणीव असली पाहिजे, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community