Amritsar मधील मंदिरावर ग्रेनेडने हल्ला; व्हिडिओ व्हायरल

64
Amritsar मधील मंदिरावर ग्रेनेडने हल्ला; व्हिडिओ व्हायरल
Amritsar मधील मंदिरावर ग्रेनेडने हल्ला; व्हिडिओ व्हायरल

अमृतसरमधील (Amritsar) ठाकुरद्वारा मंदिरावर (Thakurdwara Mandir) दोन दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी ग्रेनेडने हल्ला (Grenade attack) केला आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमुळे हल्लेखोरांची ओळख पटलेली आहे. रात्री १२.३५ च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरा हे दुचाकीवरून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. ही घटना अमृतसरच्या (Amritsar) खंडवाला (Khandwala) भागातील ठाकुरद्वार मंदिरातील ही घटना आहे. यामुळे आता संपूर्ण मंदिर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

( हेही वाचा : Dadar Hawkers : फेरीवाल्यांमध्ये गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय किती?; दादरकरांचा सवाल)

दरम्यान ठाकुरद्वारा मंदिरावर (Thakurdwara Mandir) हल्ला करण्यात आला तेव्हा मंदिराचे पुजारीही आत झोपले होते. पण सुदैवाने मंदिराचे पुजारी या हल्ल्यात थोडक्यात बचावले. सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित आरोपींचा शोध सुरु आहे. फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, दोन तरूण हे मोटारसायकलवरून येत आहेत. त्यांच्या हातात एक ध्वजही आहे. ते काही सेकंद मंदिराबाहेर उभे राहतात आणि मंदिराच्या दिशेने ग्रेनेड फेकत असल्याचे दिसते.

त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला असून त्यानंतर लगेचच मंदिरात एक मोठा स्फोट झाला, ज्या मंदिरावर हल्ला करण्यात आला ते मंदिर हे अमृसरमधील (Amritsar) खंडवाला येथील ठाकरद्वारा (Thakurdwara Mandir) आहे. अशाच प्रकारची घटना अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातही (Golden Temple) काही दिवसांपूर्वी घडली होती. त्या हल्ल्यात ५ भाविकांवर हल्ला करण्यात आला. एका अज्ञाताने पाच जणांवर रॉडचा वापर करत हल्ला केला.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.