गाझामधील युद्धाच्या विरोधात आंदोलन करणारी २१ वर्षीय कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) हिला डॅनिश पोलिसांनी अटक केली. या आंदोलनाचे आयोजन करणार्या विद्यार्थी गटाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.
‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, कोपनहेगन विद्यापिठात ४ सप्टेंबरला २० लोकांचा जमाव आंदोलन करत होता. त्यातील ३ लोक जबरदस्तीने आतमध्ये घुसले. आंदोलकांनी कोपनहेगन विद्यापिठाने इस्रायली विद्यांपिठांसमवेतचे सर्व करार रहित करण्याची मागणी केली. पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे उघड करण्यास नकार दिला; परंतु ‘स्टुडंट्स अगेन्स्ट द ऑक्युपेशन’च्या प्रवक्त्याने सांगितले की, अटक केलेल्यांमध्ये थनबर्ग (Greta Thunberg) हिचाही समावेश होता. ‘एकस्ट्रा ब्लेडेट’ या वृत्तवाहिनीने थनबर्गला अटक करतांनाचे छायाचित्र प्रसारित केले आहे.
(हेही वाचा Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवातील पावित्र्य आणि धर्मजागृतीसाठी शंभराहून अधिक गणेश मंडळ आली एकत्र)
शेतकरी आंदोलनाची टूल किट बनवली
दोन वर्षांपूर्वी देशात केंद्र सरकारच्या शेती कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यावेळी हिंसक आंदोलन झाले, त्याची टूल किट प्रसारित करण्यामध्ये ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) हिचाही समावेश होता. त्यावेळी तिचे नाव खूप चर्चेत आले होते.
Join Our WhatsApp Community