शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी अखेर महापालिकेत तक्रार निवारण कक्ष (Grievance Redressal Cell) स्थापन करण्यासाठी कार्यालय स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्यांच्यासाठी शिक्षण समिती अध्यक्षांचे दालन हे कार्यालय म्हणून देण्याचा निर्णय झाला होता. परंतु पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांनी हे दालन नाकारले असून त्याऐवजी त्यांनी सभागृह नेत्यांचे दालन असलेल्या कार्यालयाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे अखेर शिक्षण समिती अध्यक्षांच्या दालनातील व्यवस्था आता सभागृहनेत्यांच्या दालनात करण्यात आली आहे. केसरकर यांच्या या निर्णयामुळे लोढा यांच्या कार्यालयासाठी वापरल्या जाणाऱ्या अँटी चेंबरचा ताबा त्यांच्याकडे कायम राहणार आहे.
उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नंतर शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी महापालिका मुख्यालयात तक्रार निवारण कक्ष (Grievance Redressal Cell)स्थापन करत जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी लोढा यांच्या शेजारील शिक्षण समिती अध्यक्षांचे दालन हे पालकमंत्र्यांना कार्यालय म्हणून उपलब्ध करून दिले होते. परंतु केसरकर यांनी बुधवारी याची पाहणी करून हे दालन नाकारले आणि त्याऐवजी सभागृहनेत्यांच्या दालनाला पसंती दिली. त्यामुळे केसरकर यांच्यासाठी पुन्हा सभागृहनेत्यांच्या दालनामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
(हेही वाचा-Anti Terror Conference : भारताचे संरक्षण धोरण आणखी आक्रमक होणार; दिल्लीत आजपासून दहशतवादविरोधी परिषद)
दरम्यान, बुधवारी महापालिका मुख्यालयात केसरकर यांनी जनतेचा दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारात पक्षातील दोन माजी नगरसेवकांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. शिवाय सर्व तक्रारी या जिल्हाधिकारी व एसआरएस संदर्भातील असल्याने महापालिकेच्या संदर्भातील तक्रारींची (Grievance Redressal Cell)संख्या कमीच होती. त्यानंतर केसरकर यांनी महापालिका आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांसमवेत कामांचा आढावा घेतला आणि जनता दरबारातील लोकांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर ते परस्पर निघून गेले.
त्यामुळे आता येत्या बुधवारी ते आता या नवीन कार्यालयाचा ताबा घेणार असून सभागृहनेत्यांच्या दालनाशेजारील कर्मचारी वर्गासाठी असलेल्या जागेत दोन्ही पालकमंत्र्यांचे समन्वय असलेल्या मृदुला अंडे यांचे कार्यालय आता विधी समिती अध्यक्षांच्या दालनात हलवले जाणार आहे. तर पालकमंत्र्यांच्या कर्मचारी वृदांसाठी स्थापत्य शहर समिती अध्यक्षांच्या दालनाच्या बाहेरील जागा दिली जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community