भर मंडपात नव-याने केले किस, बायकोने दारी आणले पोलिस

101

लग्न सोहळा हा प्रत्येक वधू-वरासाठी आनंदाचा क्षण असतो. पण एका लग्न समारंभात नव-याने लावलेली पैज ही त्याला चांगलीच महागात पडली आहे. भर मंडपात नव-याने आपल्या बायकोचे चुंबन घेतल्यामुळे रागावलेल्या बायकोने नव-याची थेट पोलिसांत तक्रार केली आहे. त्याच्या या वर्तनाचा बायकोला इतका राग आला की तिने नव-याची थेट पोलिसांत तक्रार केली आहे.

नव-याने भर मंडपात घेतले बायकोचे चुंबन

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील बहजोई पोलिस स्थानक परिसरात 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात बदायू जिल्ह्यातील बिलसी गावचा रहिवासी असलेल्या तरुणाचा पावसा येथील तरुणीशी विवाह झाला. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी या वधू-वरांनी पावसा गावात विधिवत विवाह सोहळा पार पाडला. त्यानंतर स्टेजवरील आसनांवर बसलेल्या नव-याने भर मंडपात 300 पाहुण्यांच्या उपस्थितीत बायकोचे चुंबन घेतले.

(हेही वाचाः गॅस सिलेंडरच्या दरांबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा, कसे आहेत दर?)

बायकोची पोलिसांत तक्रार

नव-याने अचानक केलेल्या या अनपेक्षित वर्तनामुळे बायको प्रचंड संतापली आणि ती स्टेजवरुन उठून एका खोलीत जाऊन बसली. कुटुंबीयांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने नकार देत थेट बहजोई पोलिस स्थानक गाठले. बायकोने पोलिसांना नव-याने केलेल्या कृत्याबद्दल माहिती दिली. मला त्याच्यासोबत राहायचे नसून, मी माझ्या घरी राहीन, मला त्यांचे वागणे आवडत नाही. जो माणूस भर लग्न मंडपात असे कृत्य करू शकतो तो कसा सुधारेल, असा सवाल करत तिने नव-यावर कारवाई करण्यास सांगितले.

बर पक्षाची बाजू काय?

दरम्यान, वर पक्षाने आपली बाजू मांडताना पोलिसांना वेगळीच माहिती दिली. खरंतर बायकोनेच नव-याशी पैज लावली होती आणि जर नव-याने बायकोला स्टेजवर सर्वांसमोर किस केले तर ती त्याला 1500 रुपये देईल. जर त्याने असे केले नाही तर नव-याने बायकोला 3000 रुपये द्यायचे, अशी पैज लागल्याचे वर पक्षाने पोलिसांना सांगितले. पण अशी कुठलीही पैज आपल्यात लागली नसल्याचे बायकोने पोलिसांना सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.