टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ब्रिटनमधील ग्रुमिंग गँगचा मुद्दा उपस्थित केल्यावर आता युरोपसह जगभरात खळबळ माजली आहे. तसेच युनायटेड किंगडमचे (United Kingdom) पंतप्रधान कीर स्टार्मर (Keir Starmer) यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. पाकिस्तानी पुरुषांच्या ग्रुमिंग गँगने (Grooming Gang) मागच्या काही वर्षात हजारो अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषण केले असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात पाकिस्तानी वंशाचे पुरुष आरोपी असल्याचे आढळून आले आहेत. (Grooming Gang)
( हेही वाचा : CM Cleanliness Campaign : शिंदेंच्या योजना फडणवीसांना अमान्य?)
याप्रकरणी एलॉन मस्क (Elon Musk) यांनी आरोप केला की, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टार्मर (Keir Starmer) हे ग्रुमिंग गँगला (Grooming Gang) रोखण्यात अपयश ठरले आहेत. तसेच ब्रिटनच्या मंत्री जेस फिलिप्स यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी मस्क यांनी केली. ओल्डहॅम शहरात झालेल्या लैंगिक शोषणांच्या प्रकरणाची सरकारने दखल न घेतल्याचा तसेच प्रकरणाच्या चौकशीची मागणी धुडकावून लावल्याचा आरोप केला जात आहे. त्याचबरोबर लैगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या अनेक मुलींना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला जात आहे. (Pakistani)
ग्रुमिंग गँग म्हणजे काय?
ग्रुमिंग गँग ही गुन्हेगारांची एक टोळी असल्याचे सांगितले जात आहे. या टोळीत पाकिस्तानी (Pakistani) वंशाच्या पुरुषांचा समावेश असून ते अल्पवयीन मुलींना लक्ष्य करतात. सोशल मीडिया, गेमिंग आणि चॅट रुम्स अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर करून ही टोळी मुलींला शिकार ठरवत. या टोळीचे लोक मुलींना नशेच्या आहारी नेतात. तसेच मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो गोळू करून त्यांचे लैगिक शोषण करतात. यात अत्याचाराच्या बळी ठरलेल्या अनेक मुली गर्भवती राहिल्या असून काहींची मानवी तस्करी करण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. (Pakistani)
आकडेवारीनुसार २०२३ मध्ये ब्रिटनमध्ये १.१५ लाख लहान मुलांवरील लैगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले. यापैकी ४,२२८ गुन्हे हे संघटित गुन्हेगारीच्या प्रकारात मोडत आहेत. १७ टक्के गुन्ह्यात ग्रुमिंग गँगचा समावेश असल्याचे सांगितले जातेय. याप्रकरणी एप्रिल २०२३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान ऋषी सुनक ग्रुमिंग गँगचा (Grooming Gang) छडा लावण्यासाठी एक कार्य समिती स्थापन केली होती. या समितीने पहिल्याच वर्षी ५५० संशयितांना ताब्यात घेतले होते. तसेच ब्रिटनच्या ओल्डहॅम, रॉदरहॅम आणि टेलफोर्ड कॉर्नवाल आणि इतर शहरात १९९७ ते २०१३ पर्यंत कमीतकमी १४०० अल्पवयीन मुलींना लैंगिक अत्याचाराचे शिकार बनविले गेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pakistani)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community