नेताजींनी ब्रिटिशांविरुद्ध एल्गार पुकारलेले मैदान सिंगापूरचे राष्ट्रीय स्मारक

सिंगापूरमधील दोनशे वर्षे जुन्या पदांग या खुल्या हिरवळीच्या मैदानाला येथील सरकारने मंगळवारी पंचाहत्तरावे राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केले आहे. विशेष म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच मैदानावरुन 1943 मध्ये ब्रिटिशांविरोधात ‘दिल्ली चलो’ ची हाक दिली होती.

सिंगापूर सरकारने 57 व्या राष्ट्रीय दिनी पदांग हे स्थळ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे मैदान अनेक संस्मरणीय घटनांचे साक्षीदार आहे. सिंगापूरच्या मध्यवर्ती भागातील हे स्थळ 4.3 हेक्टरवर आहे. सिंगापूरच्या राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतील हे पहिलेच खुले हिरवळीचे ठिकाण आहे. एखादी इमारत किंवा स्थळाचा या यादीत समावेश होणे हा स्थळाचा सर्वोच्च बहुमान समजला जातो. हे मैदान क्रिकेट, फूटबाॅल, हाॅकी, टेनिस आणि लाॅन बाॅलिंग आदींच्या सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. सन 1800 पासून वापरात असलेले हे मैदान देशातील सर्वांत जुन्या मैदानांपैकी एक आहे.

( हेही वाचा: पवारांचं दुःख जरा वेगळं; भाजपवरील आरोपांवर फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर )

आझाद हिंद सौनिकांचे स्मारक याच मैदानात

सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठातील दक्षिण आशियाई अभ्यास विभागाचे प्रमुख राजेश राय यांनी सांगितले की, सिंगापूरमधील भारतीय समुदायाच्यादृष्टीने पदांग या स्थळाला आगळे महत्त्व आहे. या बोटावर ब्रिटिशांनी जेव्हा त्यांचे आऊट पोस्ट उभारले, तेव्हा तेथे भारतीय शिपायांनीच प्रथम आपला तळ उभारला होता. याच ठिकाणावरुन नेताजींनी आझाद हिंद सेनेचे जवान आणि येथील भारतीयांपुढे भाषणे दिली होती. येथेच नेताजींनी चलो दिल्लीची घोषणा दिली आणि झाशीची राणी पलटणीची स्थापना केली. युद्ध संपण्याच्या काही दिवस आधी याच मैदानाच्या दक्षिण टोकाला त्यांनी आझाद हिंद सौनिकांचे स्मारक उभारले होते. ते अजूनही तेथे आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here