Hindu देवतांच्या नावाने ढाबा, मालक आणि कर्मचारी मात्र मुस्लिम; २७ ढाब्यांशी जीएसआरटीसीने रद्द केला करार

92
Hindu देवतांच्या नावाने ढाबा, मालक आणि कर्मचारी मात्र मुस्लिम; २७ ढाब्यांशी जीएसआरटीसीने रद्द केला करार
Hindu देवतांच्या नावाने ढाबा, मालक आणि कर्मचारी मात्र मुस्लिम; २७ ढाब्यांशी जीएसआरटीसीने रद्द केला करार

गुजरातमध्ये एका मुस्लिम ढाबा मालकाने हिंदू (Hindu) नावाने ढाब्याचा परवाना घेतल्याचे माहिती उघडकीस आली आहे. तसेच हिंदू नावाच्या आधारे ढाबा मालकाने गुजरात राज्य रस्ते वाहतूक महामंडळ (GSRTC) सोबत करारही केला होता. गुजरातच्या सरकारी बसेस येथे भोजनासाठी थांबत असत. पर्यटक येथे हिंदू (Hindu) ढाबा म्हणून जेवण करत असत. पण आता सरकारने या ढाबा मालकावर कारवाई केली आहे.

( हेही वाचा : पोलीस पाटील हे पोलीस अधिकारी नाहीत; हा सक्षम पुरावा म्हणता येत नाही; Supreme Court चे निरीक्षण

जीएसआरटीसीने (GSRTC) राज्यातील अशा २७ ढाब्यांसोबतचा करार रद्द केला आहे. त्यामुळे या ढाब्यांवर इथून पुढे सरकारी बस भोजनासाठी थांबणार नाही. यातील काही ढाबे मुस्लिमांच्या मालकीचे होते पण ढाब्यांची नावे हिंदू (Hindu) देव-देवतांच्या नावावरून ठेवण्यात आली होती. हे ढाबे वडोदरा, राजकोट, गोधरा, मेहसाणा, भुज, भरूच, अहमदाबाद, नडियाद आणि पालनपूर यासारख्या विभागात आहेत. भुज-ध्रगंध्र-अहमदाबाद रोडवरील ‘हॉटेल शिवशक्ती’चाही या यादीत समावेश आहे. या हॉटेलचे नाव एका हिंदू (Hindu) देवतेच्या नावावर होते आणि त्याचा परवानाही एका हिंदू व्यक्तीच्या नावावर होता पण त्या ढाब्याचा मालक आणि व्यवस्थापक मुस्लिम (Muslim) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सुरत-अहमदाबाद (Surat-Ahmedabad) रोडवर असलेल्या हॉटेल तुलसीनेही (Hotel Tulsi) असाच प्रकार केला. याशिवाय, भरूच विभागातील सुरत-अहमदाबाद रोडवरील हॉटेल मारुतीचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. वडोदरा-गोधरा-मोडासा रोडवरील हॉटेल वृंदावनचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. याशिवाय, अहमदाबाद-राजकोट मार्गावर हॉटेल सर्वोदय, अहमदाबाद-बालासिनोर-गोधरा-झालोद मार्गावर हॉटेल श्रीजी, अहमदाबाद-सुरत रोडवर हॉटेल सहयोग, हॉटेल गॅलेक्सी, हॉटेल रोनक, अहमदाबाद-ध्रगंधा-भुज मार्गावर हॉटेल सर्वोदय, सुरत- अहमदाबाद रोड पण हॉटेल सीतामाताचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. (Hindu)

दरम्यान एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे आहे की, GSRTC ही गुजरात सरकारची रस्ते सेवा आहे. त्यात ८ हजारांहून अधिक बसेस आहेत. यातील अनेक बसेस लांब मार्गांवर धावतात. या लांब पल्ल्याच्या बसेस वाटेत काही ढाब्यांवर थांबतात जेणेकरून प्रवाशांना भोजन आणि विश्रांती करता येईल. हे ढाबे जीएसआरटीसीकडून (GSRTC) ठरवले जातात आणि त्यासाठी निविदा काढल्या जातात. यामध्येच मुस्लिम मालकांनी हिंदू (Hindu) ढाब्याच्या नावावर परवाने मिळवल्याची माहिती आहे. याआधीही, मुस्लिम मालकांकडून हिंदू नावाने चालवल्या जाणाऱ्या हॉटेल्स आणि ढाब्यांची चौकशी करण्याची मागणी सोशल मीडियावर सातत्याने होत आहे. आता GSRTC ने कारवाई केली आहे. (Hindu)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.