GST collection : मार्चमध्ये 11.5 टक्क्यांनी वाढले जीएसटी संकलन; आतापर्यंतची दुसऱ्या सर्वोच्च क्रमांकाची कामगिरी

GST collection : मार्च 2024 मध्ये परतावा दिल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1.65 लाख कोटी रुपये इतका आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 18.4% वाढलेला आहे.

141
GST collection : मार्चमध्ये 11.5 टक्क्यांनी वाढले जीएसटी संकलन; आतापर्यंतची दुसऱ्या सर्वोच्च क्रमांकाची कामगिरी
GST collection : मार्चमध्ये 11.5 टक्क्यांनी वाढले जीएसटी संकलन; आतापर्यंतची दुसऱ्या सर्वोच्च क्रमांकाची कामगिरी

मार्च 2024 महिन्यात 11.5% वार्षिक वाढीसह 1.78 लाख कोटी रुपये इतके आतापर्यंतचे दुसऱ्या सर्वोच्च क्रमांकाचे एकूण वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन म्हणजे जमा झाले आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून वस्तू आणि सेवा कर संकलनात 17.6% इतकी लक्षणीय वाढ झाल्यामुळे हे विक्रमी संकलन झाले आहे. मार्च 2024 मध्ये परतावा दिल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1.65 लाख कोटी रुपये इतका आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 18.4% वाढलेला आहे. (GST collection)

(हेही वाचा – Ashish Shelar : …शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावुन आले..!; ॲड. आशिष शेलार यांची उबाठावर टीका)

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मजबूत सातत्यपूर्ण कामगिरी

आर्थिक वर्ष 2023-24 हा एक मैलाचा दगड ठरला असून या कालावधीतील एकूण वस्तू आणि सेवा कर संकलन वीस लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून 20.14 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 11.7% नी वाढलेले आहे. या आर्थिक वर्षातील सरासरी मासिक संकलन 1.68 लाख कोटी रुपये आहे, जे मागील वर्षाच्या 1.5 लाख कोटीच्या सरासरीला मागे टाकणारे आहे. चालू आर्थिक वर्षासाठी मार्च 2024 पर्यंत परताव्यानंतर जीएसटी महसूल 18.01 लाख कोटी रुपये आहे जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.4% ने वाढलेले आहे.

सर्व घटकांमधील सकारात्मक कामगिरी 

मार्च 2024 मधील संकलनाचे विभाजन

• केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST): 34,532 कोटी रुपये; राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST): ₹43,746 कोटी रुपये; एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST): 87,947 कोटी रुपये, यामध्ये आयात केलेल्या वस्तूंवर गोळा केलेल्या 40,322 कोटी रुपये कराचा समावेश आहे; उपकर: 12,259 कोटी रुपये, यात आयात केलेल्या वस्तूंवर जमा केलेल्या 996 कोटी रुपये कराचा समावेश आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 संकलनांमध्ये तत्सम सकारात्मक कल दिसून आला आहे.

• केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST): 3,75,710 कोटी रुपये; राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST): 4,71,195 कोटी रुपये; एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST): 10,26,790 कोटी रुपये, यामध्ये आयात केलेल्या वस्तूंवर गोळा केलेल्या 4,83,086 कोटी रुपये कराचा समावेश आहे; उपकर: 1,44,554 कोटी रुपये, यात आयात केलेल्या वस्तूंवर जमा केलेल्या 11,915 कोटी रुपये कराचा समावेश आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.