ऑगस्ट महिन्यात एकूण जीएसटी (GST Collection) अर्थात वस्तू आणि सेवा कर 1,59,069 कोटी रुपये जमा झाला. ज्यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्राचा वस्तू आणि सेवा कराचा वाटा 28,328 कोटी रुपये आहे. तर एसजीएसटी अर्थात राज्यांचा वस्तू आणि सेवा कराचा वाटा 35,794 कोटी रुपये, आयजीएसटी अर्थात, राज्य राज्यांमध्ये व्यवहारातून मिळणारा एकात्मिक वस्तू आणि सेवा कराचा वाटा 83,251 कोटी रुपये एवढा होता. (ज्यामध्ये वस्तूंच्या आयातीवर कर रुपात मिळालेल्या 43,550 कोटी रुपयांचा समावेश आहे) त्याचबरोबर सेस कराच्या रूपाने 11,695 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. (ज्यामध्ये वस्तूंच्या आयातीवर कर स्वरूपात मिळालेल्या 1,016 कोटी रुपये महसुलाचा समावेश आहे).
महाराष्ट्रात वर्ष दर वर्ष प्रमाणात वर्ष 2022 च्या ऑगस्ट महिन्यात 18863 कोटी एवढा जीएसटी (GST Collection) महसूल जमा झाला होता तर वर्ष 2023 च्या ऑगस्ट महिन्यात राज्यात 23282 कोटी रुपये जीएसटीच्या रूपाने प्राप्त झाले, तर गोवा राज्यात 2022 ऑगस्ट महिन्यात 376 कोटी रुपये महसूल जमा झाला होता तर वर्ष 2023 च्या ऑगस्ट महिन्यात 509 कोटी रुपये जीएसटी प्राप्त झाला.
(हेही वाचा – International Coconut Day : शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास नारळ मदतनीस)
केंद्र सरकारने सीजीएसटी (GST Collection) करातून मिळणारे 37,581 कोटी रुपये आणि एसजीएसटी करातून मिळणारे 31,408 कोटी रुपये आयजीएसटी कराच्या रूपाने चुकते केले आहेत. नियमित व्यवहारानंतर ऑगस्ट 2023 या महिन्यात केंद्र आणि राज्यांचा एकूण जमा महसूल सीजीएसटी कराच्या रूपाने 65,909 कोटी रुपये, तर एसजीएसटी कराच्या रूपाने 67,202 कोटी रुपये एवढा आहे.
महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट 2023 या महिन्यात एसजीएसटी (GST Collection) कराच्या रूपाने 7630 कोटी रुपये जमा झाले तर आयजीएसटी कराच्या रूपाने 3841 कोटी रुपये चुकते करण्यात आले तर गोवा राज्यात ऑगस्ट 2023 या महिन्यात एसजीएसटी कराच्या रूपाने 174 कोटी रुपये जमा झाले होते त्यात आयजीएसटी कराच्या रूपाने 111 कोटी रुपये चुकते करण्यात आले.
ऑगस्ट 2023 या महिन्यामधील महसुल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी (GST Collection) महसुलाच्या तुलनेत 11% नी जास्त आहे. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 3% नी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात, त्याच स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 14% नी जास्त आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community