-
ऋजुता लुकतुके
जीएसटी दरांमध्ये सुधारणांचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकार समोर आहे आणि त्यासाठी सक्षम मंत्रिगटाने तंबाखू, सिगारेट, शीतपेये अशा ‘अपायकारक’ वस्तूंवर ३५ टक्के जीएसटीचा प्रस्ताव ठेवल्याचं समजतंय. पीटीआय वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. त्यामुळे असं जर प्रत्यक्षात घडलं तर ३५ टक्क्यांचा नवीन जीएसटी दर अस्तित्वात येऊ शकतो. जीएसटी (GST) दर ठरवण्याचा अंतिम अधिकार जीएसटी परिषदेचा आहे. या परिषदेच्या प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आहेत. सक्षम मंत्रिगटाचा हा प्रस्ताव आता परिषदेला सादर केला जाईल. (GST Council Meeting)
(हेही वाचा – एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? Anjali Damania यांची ‘ही’ पोस्ट चर्चेत..)
या महिन्यात २१ डिसेंबरला जीएसटी परिषदेची महत्त्वाची बैठक (GST Council Meeting) जैसलमेर इथं होणार आहे. आणि या बैठकीत जीएसटी दरांमध्ये सुधारणा करण्यावर विचार होईल. सध्या जे ४ जीएसटी दर अस्तित्वात आहेत त्यात सर्वाधिक दर आहे २८ टक्क्यांचा. तो वाढून तंबाखू उत्पादनं आणि शीतपेयं अशा अपायकारक वस्तूंसाठीचा नवीन दर अस्तित्वात येऊ शकतो, अशी चिन्हं आहेत.
(हेही वाचा – Border Gavaskar Trophy, Adelaide Test : सरावादरम्यान रोहित शर्मा शुभमन गिलला मारतो आणि…)
सध्या ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे चार जीएसटी दर अस्तित्वात आहेत. आताच्या दरांनुसार, वस्त्रोद्योग म्हणजे तयार कपड्यांसाठी ५ टक्के हा जीएसटी लागतो. पण, इथून पुढे १,००० रुपयांपेक्षा महाग कपड्यांसाठी ५ टक्क्यांऐवजी १८ टक्के इतका जीएसटी दर लागेल असा प्रस्ताव आहे. तर १०,००० रुपयांच्या वर कपड्यांवर लक्झरी वस्तू म्हणून सर्वाधिक २८ टक्के इतका दर लागू शकतो. (GST Council Meeting)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community