GST गुप्तचर महासंचालनालय GST चोरी (GST Evasion) शोधण्यासाठी एक मोठी मोहीम राबवत आहे. बिले तयार करण्यासह इतर मार्गांनी व्यापारी जीएसटी चुकवत असल्याचे आढळून आले आहे. जीएसटी चोरी रोखण्यासाठी अर्थ मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये आले आहे. चालू आर्थिक वर्षात १.३६ लाख कोटी रुपयांची चोरी उघडकीस आल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
या मोहिमेअंतर्गत, विभागाने मोठ्या प्रमाणावर बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दाव्यांची प्रकरणे शोधून काढली आहेत. डीजीजीआयने गेल्या साडेतीन वर्षांत ५७,००० कोटी रुपयांची जीएसटी चोरी शोधली असून या प्रकरणात ५०० जणांना अटकही करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १४००० कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटची एकूण १०४० प्रकरणे उघडकीस आली असून त्यात आतापर्यंत ९१ जणांना अटक करण्यात आली आहे. (GST Evasion)
२०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण १ टी रुपयांची जीएसटी चोरी आढळून आली आहे, ज्यामध्ये बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचाही समावेश आहे आणि लोकांनी स्वेच्छेने १४,१०८ कोटी रुपये जमा केले आहेत.जून २०२३ मध्ये, DGGI ने देशभरातील सिंडिकेटचे मास्टरमाइंड ओळखून त्यांना अटक करण्यावर भर दिला होता. तांत्रिक साधनांद्वारे डेटा अॅनालिटिक्सचा वापर करून GST चुकवणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा : Central Railway : मध्य रेल्वे हिवाळ्यातील तयारी आणि खबरदारीच्या उपायांसह सज्ज)
हे टॅक्स सिंडिकेट अनेकदा निष्पाप लोकांचा वापर करतात आणि त्यांना नोकरी, कमिशन, बँक कर्ज देण्याचे आमिष दाखवतात आणि त्यांच्याकडून केवायसी कागदपत्रे घेतात ज्याद्वारे त्यांच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय बनावट, शेल फर्म किंवा कंपन्या उघडल्या जातात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community