जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी शनिवार दिनांक 16 जुलैला देशव्यापी बंदची हाक दिली आहे. पॅकिंग केलेल्या अनब्रॅंडेड अन्नधान्य, डाळी आदी पदार्थांवर 18 जुलैपासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे. व्यापारी संघटनांनी त्याचा निषेध केला आहे. त्यासाठी 16 जुलैला एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळण्यात येणार आहे. जीएसटी लागू होताच अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. धान्य आणि डाळी 8 ते 10 टक्क्यांनी वाढतील असे व्यापा-यांचे म्हणणे आहे.
( हेही वाचा: कोकणवासीयांना बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर २४ विशेष गाड्या )
18 जुलैपासून सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का
18 जुलै 2022 पासून सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का बसणार आहे. 28-29 जून रोजी झालेल्या GST काउन्सिलच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी 18 जुलैपासून होणार असून, त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. जीएसटी काउन्सिलने सामान्य माणसांद्वारे वापरल्या जाणा-या अनेक वस्तूवंरील कर दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community