GST on Used Cars : वापरलेल्या कार, ईव्हींवरील १८ टक्के जीएसटीची भानगड काय आहे?

78
GST on Used Cars : वापरलेल्या कार, ईव्हींवरील १८ टक्के जीएसटीची भानगड काय आहे?
GST on Used Cars : वापरलेल्या कार, ईव्हींवरील १८ टक्के जीएसटीची भानगड काय आहे?
  • ऋजुता लुकतुके

जीएसटी परिषदेनं अलीकडे जीएसटी कररचनेत काही बदल केले. आणि यामध्ये वापरलेल्या कारच्या विक्रीवर १८ टक्के जीएसटी लावला होता. म्हणजेच सेकंड हँड कार आणि इलेक्ट्रिक कारच्या विक्रीवरही आता जीएसटी लागणार असल्यामुळे या कलमाला जोरदार विरोधही झाला. २१ तारखेला झालेल्या बैठकीत जीएसटी परिषदेनं म्हटलं होतं की, ‘वापरलेल्या सर्व प्रकारच्या कार आणि इलेक्ट्रिक वाहनांवर आता १८ टक्के जीएसटी लागेल.’ त्यामुळे लहान गाड्यांनाही आता कर लागणार असा लोकांचा समज झाला. (GST on Used Cars)

पण, आता जीएसटी परिषदेनं यावर काय स्पष्टीकरण दिलं आहे ते पाहूया. ‘फक्त व्यापारी उद्देशाने केलेला खरेदी – विक्रीचा व्यवहार आणि त्यासाठी दोन कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहारावरच १८ टक्के जीएसटी लागेल. दोन व्यक्तींमध्ये झालेल्या व्यवहारावर हा जीएसटी लागणार नाही. जीएसटी लागू करताना मूळ खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत यात नफा झालेला असेल तर या नफ्याच्या रकमेवरच हा कर लागू होईल. नफा मोजताना त्यात गाडीची डेप्रिसिएशन कॉस्टही विचारात घेतली जाईल.’ (GST on Used Cars)

(हेही वाचा- Boxing Day Test : विराट, अनुष्का दिसले मेलबर्नच्या रस्त्यावर शॉपिंग करताना)

म्हणजेच घरगुती वापरासाठी एखादी व्यक्ती किंवा कुटुंबाने घेतलेली गाडी हे कुटुंबं विकत असेल तर त्यावर १८ टक्के जीएसटी बसणार नाहीए. व्यक्तींनी असा व्यवहार केला असेल तर त्यावर आधीप्रमाणेच १२ टक्के इतका जीएसटी लागेल. (GST on Used Cars)

जुन्या कारच्या खरेदी विक्रीवर आधीपासूनच जीएसटी लागू होतो. यात घरगुती वापराच्या आणि हॅचबॅक सारख्या छोट्या गाड्यांवर १२ टक्के तर १२०० सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या आणि ४००० मिमीपेक्षा जास्त लांबी असलेल्या कार तसंच इलेक्ट्रिक कारवर यापूर्वीही १८ टक्के जीएसटी लागू होत होता. (GST on Used Cars)

(हेही वाचा- प्रयागराज येथील महाकुंभमेळा लक्ष्य करण्याची खलिस्तानी दहशतवादी Gurpatwant Singh Pannu ची धमकी)

जीएसटीचं मूल्य काढताना कार तसंच इलेक्ट्रिक वाहनाची नोंदणीच्या वेळची किंमत गृहित धरली जाईल. आणि काही वर्षांच्या वापरामुळे त्यात होणारं अवमूल्यन किंवा घसाऱ्याची किंमतही त्यात गृहित धरली जाईल. ही किंमत वजा करून होणाऱ्या नफ्यावर जीएसटी लागू होईल. कारची खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत वजा घसारा किंमत जर शून्य किंवा त्याच्या खाली असेल तर नवीन ग्राहकाला जीएसटी भरावा लागणार नाही. (GST on Used Cars)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.