रेल्वेचे कन्फर्म झालेले तिकीट रद्द करताना रेल्वे काही टक्के रक्कम प्रवाशांकडून कापून घेते परंतु आता यावर सुद्धा जीएसटी लागणार आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात ३ ऑगस्टला परिपत्रक काढले आहे. त्यानुसार रेल्वेचे निश्चित केलेले तिकीट रद्द करण्याबरोबरच हॉटेलचे आरक्षण रद्द केल्यासही जीएसटी आकारला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
( हेही वाचा : रेल्वेत चोरांचा सुळसुळाट; ५ दिवसात १६९ मोबाईल लंपास )
रद्द केलेल्या तिकिटांवर लागणार अतिरिक्त जीएसटी
सध्या वातानुकूलित प्रथम श्रेणीचे निश्चित झालेले आरक्षण ४८ तासांच्या आता रद्द केले तर २४० रुपये शुल्क आकारले जाते. तर वातानुकूलित टू टियरसाठी २०० रुपये, थ्री टियरसाठी १८० रुपये आणि आसन श्रेणीतील तिकीट रद्द केले तर १८० रुपये शुल्क आकारण्यात येते. तसेच १२ तासांच्या आत तिकीट रद्द केले तर २५ टक्के आणि चार तासांच्या आत तिकीट रद्द केले तर ५० टक्के शुल्क आकारले जाते. त्यामुळे या शुल्कावर आता अतिरिक्त पाच टक्के वस्तू व सेवा कर लागू केला जाणार आहे. तसेच द्वितीय शयनयान श्रेणीचे तिकीट रद्द केल्यास त्यावर जीएसटी लागू होणार नाही. रद्द केलेल्या आरक्षित तिकिटांवर जीएसटी लागू केल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community