इंधनांचे दर आधीच गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे लोक त्रस्त आहेत. त्यातच आता तब्बल 143 जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीतही वाढ होणार आहे. जीएसटी परिषदेने एकूण 143 वस्तूंचा GST स्लॅब वाढवण्याची सूचना केली आहे. या 143 वस्तूंपैकी, 18 टक्के कर स्लॅबमधून 28 टक्के कर स्लॅबमध्ये 92 टक्के हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे.
या वस्तू महागणार
मिळीलेल्या माहितीनुसार, पापड, गूळ, पाॅवर बॅंक, घड्याळे, सुटकेस, हॅंडबॅग, परफ्यूम, रंगीत टीव्ही संच, चाॅकलेट, च्युइंगम, अक्रोड, कस्टर्ड पावडर अशा वस्तूंचा जीएसटी दर वाढवला जाऊ शकतो. अल्कोहोल, शीतपेये, सिरॅमिक सिंक वाॅश बेसिन, गाॅगल, चष्म्यासाठी फ्रेम आणि चामड्याचे कपडे आणि कपड्यांच्या वस्तूंचा समावेश आहे.
( हेही वाचा: जुनी मुंबई कशी होती? बॉम्बे ते मुंबई असा उत्कंठावर्धक प्रवास आमच्या मुंबईचा… )
जीएसटी ही चार स्तरीय रचना
जीएसटी ही चार स्तरीय रचना आहे. ज्यावर अनुक्रमे 5%, 12%, 18% आणि 28% दराने कर आकारला जातो. अत्यावश्यक वस्तूंना सर्वात कमी स्लॅबमध्ये सूट किंवा कर लावला जातो, तर लक्झरी आणि डिमेरिट वस्तू उच्च कर स्लॅबच्या अधीन असतात. सोने आणि सोनेच्या दागिन्यांवर 3 कर आकारला जातो. ब्रॅंड नसलेले आणि अनपॅक केलेले खाद्यपदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थ जीएसटीच्या कक्षेबाहेर आहेत.