Guardian Minister : माजी पालकमंत्र्यांच्या मतदार संघात कृत्रिम तलावांची संख्या घटली, आजी पालकमंत्र्यांच्या मतदार संघात वाढली

यंदाच्या गणेशोत्सवाध्ये केवळ ९ कृत्रिम तलावांची सुविधा देण्यात आली आहे, त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत पाच तलावांची संख्या घटलेली पहायला मिळत आहे

171
Guardian Minister : माजी पालकमंत्र्यांच्या मतदार संघात कृत्रिम तलावांची संख्या घटली, आजी पालकमंत्र्यांच्या मतदार संघात वाढली
Guardian Minister : माजी पालकमंत्र्यांच्या मतदार संघात कृत्रिम तलावांची संख्या घटली, आजी पालकमंत्र्यांच्या मतदार संघात वाढली

सचिन धानजी, मुंबई

मुंबईत पर्यावरण पुरक गणेश मूर्तींचे विसर्जन व्हावे म्हणून समुद्राऐवजी भाविकांनी कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या मार्फत प्रेरित केले जात आहे. त्यामुळे यंदा महापालिकेच्यावतीने १९१ कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या २९ ने वाढली आहे.  परंतु यामध्ये माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळीलोअर परळ विधानसभा क्षेत्रात यंदा ५ कृत्रिम तलावांची संख्या कमी झाली आहे. तर उपनगराचे विद्यमान पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मलबारहिल विधानसभा क्षेत्रात तब्बल ७ कृत्रिम तलावांची संख्या वाढवली गेली आहे. तर माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व आमदार यामिनी जाधव यांच्या भायखळा विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे १० कृत्रिम तलावांची संख्या वाढल्याचेही पाहायला मिळत आहे.

माजी पर्यावरण मंत्री व उपनगराचे माजी पालकमंत्री (Guardian Minister) आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा क्षेत्रात मागील गणेशोत्सवामध्ये १४ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु यंदाच्या गणेशोत्सवाध्ये केवळ ९ कृत्रिम तलावांची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत पाच तलावांची संख्या घटलेली पहायला मिळत आहे. यामध्ये मागील वर्षी जांभोरी मैदानात ४ तलावांची सुविधा देण्यात आली होती, त्याऐवजी यंदा केवळ एकच तलाव बांधण्यात आले आहे. तर  आदर्श नगर वरळी स्पोर्टस क्लब मैदान, न्यू प्रभादेवी मार्गावरील राजाभाऊ साळवी मैदान आणि ना.म.जोशी मार्गावरील महाराष्ट्र हायस्कूल मैदानातील प्रत्येक एक तलाव रद्द करून त्याठिकाणी प्रत्येकी एकच तलाव बांधण्यात आला आहे. जिजामाता नगर येथील तलाव यंदा बंद करण्यात आले आहे. तर वीर नेताजी मैदान बीडीडी चाळ आणि सेनापती बापट मार्ग सीएस क्रमांक १४१ याठिकाणी प्रत्येकी एक तलाव नव्याने वाढवण्यात आले आहे.

तर दुसरीकडे उपनगराचे विद्यमान पालकमंत्री (Guardian Minister) मंगलप्रभात लोढा यांच्या मलबारहिल विधानसभा क्षेत्रात मागील वर्षी ७ कृत्रिम तलावांची सुविधा होती, परंतु यंदाही ही संख्या दुप्पट करण्यात आली. त्यामुळे या मतदार संघात ७ कृत्रिम तलावांची संख्या  वाढली आहे. मागील वर्षी सुविधा देण्यात आलेल्या ताडदेवमधील दादासाहेब विचारे मार्गावरील कृत्रिम तलाव यंदा बंद करण्यात आले आहे तर उर्वरीत चार ठिकाणी यंदाही ही सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय गिल्डर लेन महापालिका वसाहत,  ताडदेव  आरटीओ बॉडीगार्ड लेन,  सुर्यवंशी उदयान खेतवाडी ४ थी गल्ली जंक्शन, टाटा मार्ग क्रमांक गिरगाव, गिरगाव चौपाटी, एसव्हीपी मार्ग केळकर पोलिस चौकी, ताडदेव फिल्म सेंटर इमारत आदी ठिकाणी नव्याने कृत्रिम तलाव सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये गिरगाव चौपाटीवर दोन कृत्रिम तलावांची सुविधा महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.

(हेही वाचा-Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त)

भायखळा महापालिका ई विभाग  कार्यालयाच्या हद्दीतील डॉक यार्ड रोड स्टेशन जवळील एकनाथ बांदल मैदान आणि आग्रीपाडा महापालिका शाळेच्या मैदानातील कृत्रिम तलाव यंदा रद्द करण्यात आली आहेत. त्याऐवजी आता नवीन जागी १२ कृत्रिम तलावांची सुविधा देण्यात आली आहे. तर चिंचपोकळी आचरेकर मैदान, भायखळा शाळेचे मैदान, उमेश साळुंखे मार्ग डी पी वाडी मैदान, डॉक यार्ड रोड गंगा बावडी मैदान,भायखळा पश्चिम माँटे साऊथ,  आग्रीपाडा लाल मैदान आदी ठिकाणी प्रत्येकी दोन कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तर राणी बाग येथील मैदानात आणखी एक कृत्रिम तलाव वाढवण्यात आल्याने याठिकाणी एकूण ३ तलावांची निर्मिती केली आहे.

माहिम,दादर आणि धारावी या जी उत्तर विभागात मागील वर्षी प्रमाणेच दहा कृत्रिम तलावांची निर्मिती झाली आहे तर घाटकोपरमध्ये यंदा नव्याने सहा तर आजवर नरिमन पॉईंट, कुलाबा,फोर्ट या ए विभागात यंदा नव्याने ३ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय कुर्ला एल विभागात ३, दहिसर आर दक्षिण विभागात २, भांडुप पवई या एस विभागात ९ अशाप्रकारे कृत्रिम तलावांची संख्या वाढली गेली आहे.

कृत्रिम तलावांमधील एकूण गणेश मूर्तींचे विसर्जन (आकडेवारी)

सन २०२२ :  एकूण विसर्जन : ६६,१२७ ( घरगुती :६१९८५,  सार्वजनिक :१८२२)

सन २०२१ :  एकूण विसर्जन : ७९,१२९ ( घरगुती :७२३४७,  सार्वजनिक :३४९८)

सन २०२० :  एकूण विसर्जन : ६८,११९ ( घरगुती : ६४३८६,  सार्वजनिक :३७३३)

सन २०१९ :  एकूण विसर्जन : ३३,२१७ ( घरगुती : ३२६२९,  सार्वजनिक :५८८)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.