पालकमंत्र्यांनी घेतला महापालिका मुख्यालयातील नागरीक कक्ष कार्यालयाचा ताबा

210
पालकमंत्र्यांनी घेतला महापालिका मुख्यालयातील नागरीक कक्ष कार्यालयाचा ताबा
पालकमंत्र्यांनी घेतला महापालिका मुख्यालयातील नागरीक कक्ष कार्यालयाचा ताबा

मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अखेर महापालिका मुख्यालयातील नागरीक कक्ष कार्यालयाचा ताबा घेतला. पालकमंत्र्यांसाठी महापालिका मुख्यालयात कार्यालय उपलब्ध करून दिल्यामुळे याचे तीव्र पडसाद विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले होते. विरोधी पक्षांनी या उपलब्ध करून दिलेल्या दालनाबाबत तीव्र शब्दांत टिका करत इशारा दिल्यानंतर लोढा यांनी संध्याकाळी साडेचार वाजता या कार्यालयात उपस्थित राहत आदित्य ठाकरेंसह विरोधी पक्षांचे आव्हान स्वीकारले.

New Project 2023 07 21T195051.478

मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी बाजार व उद्यान समिती अध्यक्षांचे दालन आणि कर्मचारी वर्गांचे कार्यालयाची जागा ही नागरीक कक्ष कार्यालयासाठी उपलब्ध करून दिली आहे. या कार्यालयासह महापालिकेच्या चिटणीस विभागातील दोन शिपाई आणि एक लघुलेखक व टंकलेखक स्वीय सहायकही पालकमंत्र्यांच्या दिमतीला देण्यात आले आहे. मात्र, उपनगराच्या पालकमंत्र्यांना दिलेल्या या दालनाचा वापर भाजपचे नगरसेवक कार्यालय म्हणून करतील याच विचाराने विरोधकांचा तिळपापट झाला असून या दालनाचा तीव्र विरोध विधीमंडळाच्या सभागृहात नोंदवण्यात आला. आमदार आदित्य ठाकरे यांनी मग महापौरांना मंत्रालयात दालन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच आपण दालनाचा ताबा घ्याच, एका तासातच याची प्रतिक्रिया उमटेल अशाप्रकारचा सूरही त्यांनी आळवला.

 

 

परंतु सायंकाळी साडेचारच्या सुमारास उपनगराचे पालकमंत्री लोढा हे महापालिका मुख्यालयात आले आणि त्यांनी आपल्या नवीन नागरीक कक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेतला. यावेळी भाजपचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी चार वाजेपर्यंत पालकमंत्री येणार नसल्याची माहिती मिळाल्याने हे कार्यालय बंद करण्यात आले होते, परंतु त्यानंतर पालकमंत्री येत असल्याने हे कार्यालय पुन्हा उघडण्यात आले. त्यामुळे या कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर लोढा यांनी राष्ट्रपुरुषांचया तसबिरींना पुष्पहार अर्पण करून आपल्या कामकाजाला सुरुवात केली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी लावलेल्या सी. सी. टिव्ही कॅमेरांच्या आधारे नियंत्रण कक्षातील वॉलवरून पावसाचे पाणी कुठल्या भागात तुंबले तसेच वाहतूक व्यवस्था कशाप्रकारे आहे याची माहिती जाणून घेतली. तसेच जनजीवनावर काही परिणाम नाही ना याचीही माहिती जाणून घेतली. यावेळी सर्व महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

New Project 2023 07 21T195255.070

(हेही वाचा – Cyber Crime : महिलांचे फोटो मॉर्फ करून खंडणी मागणाऱ्या सायबर गुन्हेगाराला अटक)

कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर पालकमंत्री लोढा यांनी हे दालन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याचे सांगत कोणाला काय म्हणायचे ते म्हणून द्या, आम्ही जनतेत जावून काम करणारे आहोत, केवळ सोशल मिडियावर काम करणारे नाही आहोत अशा शब्दांत विरोधकांचा समाचार घेतला. या दालनात सर्वच पक्षांचे नगरसेवक येऊ शकतात. या दालनाचा वापर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केला जाणार आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून १५ हजार अर्ज आले होते, त्यापैंकी साडेतीन हजार अर्जांचा निपटारा केल्याचेही त्यांनी म्हटले. आपल्याप्रमाणे शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांचेही दालन महापालिका मुख्यालयात हवे अशीही इच्छा लोढा यांनी प्रसारामाध्यमांशी बोलतांना बोलून दाखवली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.