मुंबईत कडक निर्बंधात काय असणार दुकानांच्या वेळा? महापालिकेचे निर्देश

76

मुंबईतील अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार यादिवशी उघडी ठेवली जाणार असून, शनिवार व रविवार या दिवशी सर्व दुकाने बंद राहणार आहेत. राज्य सरकारच्या ब्रेक दि चेन मिशन अंतर्गत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंध लावण्याबाबत मार्गदर्शक तत्त्व जाहीर करण्यात आल्यानंतर मुंबई महापालिकेने या अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार मुंबईच्या हद्दीत निर्बंध जारी करताना अत्यावश्यक दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व दिवस उघडी राहतील. तसेच आवश्यकतेनुसार दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत एक दिवस आड दुकाने सुरू ठेवता येणार आहेत.

काय आहे या मार्गदर्शक तत्त्वांमधील निर्देश

  • पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजुकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवारी उघडी राहतील व रस्त्याच्या डाव्या बाजुकडील दुकाने मंगळवार, गुरुवारी उघडी राहतील.
  • पुढील आठवड्यात रस्त्याच्या डावी बाजुकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवारी उघडी राहतील व रस्त्याच्या उजवीकडील दुकाने मंगळवार व गुरुवारी उघडी राहतील. अशाच पध्दतीने पुढील आठवड्यांमध्ये दुकाने उघडी राहतील.
  • शनिवार व रविवारी दुकाने पूर्णत: बंद राहतील.

(हेही वाचाः १ मे पर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन! असे आहेत नवीन निर्बंध)

  • ई-कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंबरोबर वस्तूंचे वितरण करण्यास परवानगी असेल.
  • राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले ब्रेक दि चेन याबाबतचे आदेश अस्तित्त्वात असेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.
  • सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व इतर उपाययोजना बंधनकारक राहतील.
  • या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शवल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.