तिरंग्याच्या रंगात २३५० हेल्मेटची रचना, अरुणाचल प्रदेशात पहिलावहिला विश्वविक्रम घडला!

79

२० नोव्हेंबर २०२२ रोजी अरुणाचल प्रदेश सरकार आणि अमेझिंग नमस्ते फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवण्यात आला. हा विक्रम सीमावर्ती शहर तवांगमध्ये साकारण्यात आला. तब्बल २ हजार ३५० शिरस्त्राण (हेल्मेट) भारताच्या राष्ट्रध्वज तिरंगाच्या रंगामध्ये ‘जय हिंद’ शब्द रचना करून मांडण्यात आले.

ग्यालवा त्सांगयांग ग्यात्सो हाय अल्टिट्यूड स्टेडियममध्ये अशी विलक्षण रचना साकारण्यात आली. अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी यांच्या संयुक्त प्रयत्नामधून हा विक्रम करण्यात आला.

helmet1

२० नोव्हेंबर दिवसाचे औचित्य साधून विश्वविक्रम

या उपक्रमाच्या अंतर्गत १३६ फूट लांब आणि ३१ फूट रुंद रचना करण्यात आली. यासाठी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांनी एकत्र येऊन त्यांनी विश्वविक्रमी रचनेमध्ये हेल्मेट लावले. सकाळी ६.३० वाजल्यापासून या जागतिक उपक्रमाला सुरुवात झाली आणि ९.३० वाजता रचना पूर्ण झाली. ‘रस्ते सुरक्षा आणि वाहतूक शिस्त’ यावर अरुणाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. ६० वर्षांपूर्वी याच दिवशी चीनच्या सैन्याला जोरदार विरोध झाल्यावर त्यांनी तवांग शहरामधून माघार घेतली होती. या दिवसाचे औचित्य साधून हा विश्वविक्रम करण्यात आला. तवांग जवळील बूमला येथील आंतरराष्ट्रीय सीमा भागाला जगभरातील पर्यटक भेट देत असतात. दरवर्षी २० नोव्हेंबर या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

helmet

(हेही वाचा पाटणमध्ये लव्ह जिहाद; वासनांध मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदू मुलीला मारहाण करत लैंगिक अत्याचार )

‘लक्ष्य- मान, शान, किर्तीमान’ असे उपक्रमाचे नाव 

हा जागतिक विक्रम घडवून आणण्यासाठी यामध्ये मोठ्या संख्येने स्थानिकांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमाला ‘लक्ष्य- मान, शान, किर्तीमान’ असे नाव देण्यात आले होते. या ऐतिहासिक दिवशी एका दुचाकी रॅलीचेही आयोजन करण्यात आले. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वात सर्व दुचाकीस्वारांनी मराठा मैदानाला भेट दिली आणि तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून सर्व जण विश्वविक्रम घडवण्यात आलेल्या ठिकाणी आले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांनी तीन स्वतंत्र निरिक्षकांच्या मदतीने सर्व गोष्टी तपासल्यानंतर हा विश्वविक्रम पूर्ण झाला असल्याचे घोषित केले आणि मुख्यमंत्री पेम खांडू आणि अतुल कुलकर्णी यांना विश्वविक्रम केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. अशा प्रकारच्या अनोख्या विश्वविक्रमाच्या माध्यमातून पूर्वोत्तर भारतातील अपार संधी देश/जगासमोर मांडण्याचा ह्या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.