गेल्या आठवड्याभरापासून गुजरात आणि महाराष्ट्र राज्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. पावसाचा मारा नजीकच्या राज्यांतही वाढत असल्याने, भारतीय हवामान खात्याने पावसाची धास्ती लक्षात घेत पूराच्या धोक्याबाबत गुजरात आणि महाराष्ट्राला पुराची भीती असल्याची पूर्वसूचना जारी केली आहे. सोमवारी सकाळी नॅशनल फ्रेश फ्लड गायडन्स बुलेटीनच्या माध्यमातून गुजरातमधील अरबी समुद्रालगत असलेल्या दक्षिणेकडील बहुतांश भागांत तसेच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात पूराचा धोका असल्याची भीती भारतीय हवामान खात्याने जारी केली.
गुरुवारी सकाळी जारी केलेल्या बुलेटीनमध्ये गुजरात आणि महाराष्ट्रात धूमाकुळ घालणा-या पावसाने गुजरातेतील दक्षिण आणि जवळच्या पालघर जिल्ह्यात पाण्याचा वाढलेला साठा सायंकाळी साडेपाचपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली. गुजरातेतील वल्साड, सुरत, भारूच, नर्मदा, दमण आणि दादरा नगर हवेली तसेच उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यांला भारतीय हवामान खात्याकडून संभाव्य पूराबाबत मध्यम स्वरुपाचा इशारा (मॉडरेट थ्रेट) जारी करण्यात आला. मध्यरात्री कोसळलेल्या पावसामुळे भारतीय हवामान खात्याकडून ही भीती व्यक्त करण्यात आली.
देशभरातील निरीक्षण
देशभरातील पावसाच्या कामगिरीची दखल घेत तेलंगणा, मध्य प्रदेशातील पूर्व आणि पश्चिमेकडील भाग, गुजरातेतील दक्षिणेकडील भाग, गोवा, कर्नाटक राज्यातील किनारपट्टीतील भाग तसेच महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण भागांत पाण्याची भूजल पातळी वाढत असल्याचे, भारतीय हवामान खात्याशी निगडीत हायड्रोमेट विभागाच्या निदर्शनास आले. सकाळी साडेपाचच्या नोंदीत मध्य महाराष्ट्र, केरळातील माहे प्रदेशातील काही भागांत पावसाची नोंद जास्त दिसून आली. सहा तासांत या दोन्ही विभागांतील काही भागांत १२० मिमी तर गेल्या २४ तासांत २४० मिमी एवढा पाऊस झाला.
( हेही वाचा: न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांचे पहिले ट्वीट, ‘म्हणाले प्रतिकूल परिस्थितीत…’ )
१२ जुलैसाठीचा इशारा
विविध राज्यातील पाऊस लक्षात घेता ११ जुलैला सकाळी ६ वाजून ४० मिनिटांपासून ते दुस-या दिवशीच्या १२ जुलैपर्यंतच्या २४ तासांच्या काळात मध्य प्रदेशातील पूर्व आणि पश्चिमेकडील भाग, महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भातील पूर्व आणि दक्षिणेकील भाग, गोवा, गुजरातेतील सौराष्ट्र, तेलंगणातील उत्तरेकडील भाग, कर्नाटकातील किनारपट्टीजवळील भागांना मध्यम स्वरुपातील धोक्याचा इशारा जारी करण्यात आला.
Join Our WhatsApp Community