गुजरात येथील मोरबी येथे नदीच्या वरील झुलता पूल हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू आहे. नेमका हा पूल अचानक तुटला. त्यामुळे १०० हुन अधिक नागरिक नदीत पडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बचाव कार्य करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे संध्याकाळी सात वाजता ही घटना घडली. रात्र होणार असल्याने बचाव कार्यात अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुलाची दुरुस्ती पाच दिवसांपूर्वी करण्यात आलेली
ही घटना घडताच बचाव कार्यासाठी प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या पुलाची दुरुस्ती पाच दिवसांपूर्वी करण्यात आली होती. तरीही हा पूल कसा कोसळला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पुलावर 400-500 नागरिक होते, ते सगळे नागरिक नदीत पडल्याने चिंता व्यक्त होत आहे. नदीत जे पडले आहेत, त्यातील अनेक जण बुडाल्याची शक्यता आहे. आता बचाव कार्य जसे पुढे जाईल, तसे मृतांची संख्या समोर येण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community