गुजरातमध्ये झुलता पूल दुर्घटनेत मृतांचा आकडा पोहचला ६० वर

138
गुजरात येथील मोरबी येथे मच्छू नदीवरील झुलता पूल हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू बनला होता. नेमका हा पूल अचानक तुटला. त्यामुळे ४००-५०० नागरिक नदीत पडले. इथे मोठ्या प्रमाणात बचाव कार्य करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे संध्याकाळी सात वाजता ही घटना घडली. रात्र होणार असल्याने बचाव कार्यात अडचणी येऊ लागल्या, या दुर्घटनेत रात्री ९ वाजता मृतांची संख्या ६० वर पोहोचल्याची माहिती मिळाली. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधानांचा मुख्यमंत्री पटेल यांना फोन 

मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल सुमारे ७ महिन्यांपासून बंद होता. १०० वर्षे जुना असलेला हा पूल डागडुजी करून पुन्हा सुरु करण्यात आला. केवळ ५ दिवसांपूर्वीच तो कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात येत आहे. नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या अपघातानंतर केबल पुलाचे अनेक फोटो समोर आले असून, त्यात पूल मधूनच तुटून नदीत बुडाल्याचे दिसून येत आहे. पूल तुटल्यानंतर अनेकजण मधोमध अडकले असून, तुटलेला पूल धरून कसे तरी वाचण्याचा प्रयत्न करत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. मोरबी येथील अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी बचाव कार्यासाठी तात्काळ पथके तयार करण्यास सांगितले आहे. पीएम मोदींनी परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.