अस्मा खान निघाल्या ‘कृष्णा हिंग’च्या मालकीण, संबंध ‘टेरर फंडिंग’शी

गुजरातस्थित न्यू भारत हिंग सप्लायर्सचा मालक अस्मा खान यांच्या कार्यालयावर एनआयएने नुकताच छापा टाकला, खान यांचे दहशतवादी संघटनांशी आर्थिक संबंध असल्याच्या आरोपावरून ही छापेमारी करण्यात आली. ही कंपनी हिंग (हिंग) ब्रँड कृष्णा हिंगची विक्री करते. एनआयएकडून तब्बल ८ तास ही छापेमारी सुरु होती.

दिल्लीला दहशतवादी कारवायांसाठी फंडिंग करायचे 

एनआयएने नैदाद पोलीस गुन्हे शाखा आणि एसओजीच्या मदतीने छापा टाकला. एनआयएला दहशतवादी फंडिंग लिंकवर माहिती मिळताच हा छापा टाकण्यात आला, ज्यामध्ये नडियादहून दिल्लीला दहशतवादी कारवायांसाठी निधी पाठवला जात होता, अशी माहिती मिळाली. त्यामुळे एनआयएचे पथक मरीदा रोड येथील कंपनीच्या कार्यालयात पोहोचले. न्यू भारत हींग सप्लायर्सच्या कार्यालयाव्यतिरिक्त अस्मा खान पठाण यांच्या घरावरही तपास यंत्रणेने छापा टाकला. एनआयएच्या पथकाने छापेमारी दरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या. विशेष म्हणजे अस्मा खान या दिल्ली वक्फ बोर्डाच्या गुजरात राज्य सदस्या आहेत.

(हेही वाचा मढ, मार्वेतील अस्लम शेख यांच्या अनधिकृत स्टुडिओंवर हातोडा )

स्वतःला म्हणवायच्या मोदी समर्थक

एनआयएला अस्मा खान विरुद्ध दिल्लीत दहशतवादी फंडिंगबद्दल एक महत्वाची माहिती मिळाली होती. अस्मा खान पठाण स्वत:ला ‘मोदी समर्थक’ म्हणवतात आणि पंतप्रधान मोदींसोबत त्यांचे फोटो आहेत. परंतु अस्मा खान या काँग्रेसधार्जिण्या आहेत, असेही बोलले जात आहे. गुजरात 2002 च्या दंगलीनंतर त्याच्या नातेवाईकाचा शोध घेण्यात पंतप्रधान मोदींकडून मदत मिळाल्यानंतर अस्मा भाजप समर्थक बनली. या प्रकरणी भाजपकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here