पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 2024 च्या पहिल्या दिवशी गुजरातमध्ये 108 ठिकाणी सूर्यनमस्कार करण्यात आले. हा गुजरातचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) तयार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रसिद्ध मोढेरा सूर्यमंदिराची छायाचित्रेही दाखवली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लोकांना सूर्यनमस्कार हा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवण्याचे आवाहन केले.
(हेही वाचा – Chitraratha On Rajpath : चित्ररथावरून राजकारण तापले)
Gujarat welcomed 2024 with a remarkable feat – setting a Guinness World Record for the most people performing Surya Namaskar simultaneously at 108 venues! As we all know, the number 108 holds a special significance in our culture. The venues also include the iconic Modhera Sun… pic.twitter.com/xU8ANLT1aP
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2024
4000 हून अधिक लोकांचा सहभाग
गुजरातने नवीन वर्षाचे वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. 2024 चे स्वागत करत 108 ठिकाणी एकाच वेळी सर्वाधिक संख्येने लोक सूर्यनमस्कार करत असल्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 108 ठिकाणी आणि 51 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये या सूर्यनमस्कार (Surya Namaskar) योग कार्यक्रमात 4000 हून अधिक लोकांनी भाग घेतला. भव्य मोढेरा सूर्य मंदिरात झालेल्या या विक्रमी कार्यक्रमाला अनेक कुटुंबे, विद्यार्थी, योगप्रेमी आणि अगदी ज्येष्ठ नागरिकांसह विविध गट उपस्थित होते.
(हेही वाचा – Rammandir Pran Pratishtha : गर्भगृहात विराजमान होणार 51 इंचांची उभी मूर्ती)
108 या संख्येला विशेष
108 या संख्येला आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘आज गुजरातने सूर्यनमस्कारात देशाचा आणि जगातील पहिला जागतिक विक्रम नोंदवला आहे, जिथे हजारो लोकांनी 108 ठिकाणी एकत्र योग केला आहे, मला खूप अभिमान वाटत आहे’, असे गुजरातचे गृहमंत्री सिंघवी यांनी म्हटले आहे. (Gujarat Surya Namaskar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community