मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी नेहमी मराठी राजभाषा दिन जवळ आल्यावर होत असते. सत्तेत असणारा पक्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरु असल्याचे सांगत असतो. पण असं असूनही अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. मराठी भाषेला दर्जा मिळण्यात गुजराती भाषेचा अडसर ठरत असल्यानेच केंद्राकडून हात आखडता घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. भाषांची ही कटकट लक्षात घेता अभिजात भाषेच्या दर्जाची प्रक्रियाच मोडीत काढण्याचा विचार केंद्राच्या पातळीवर सुरू झाल्याचेही समजते. त्यामुळे जर ही दर्जा प्रक्रियाच काढून घेतली गेली तर, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नाही हे स्पष्ट आहे.
शक्यता फार कमी
मराठी भाषा खात्याचे मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री जी. किसन रेड्डी यांची भेट घेतली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून साऱ्या प्रक्रियेची पूर्तता राज्य सरकारने केली आहे. तसे पत्रही केंद्र सरकारकडून प्राप्त झाले. संसदेत सरकारकडून तशी माहितीही देण्यात आली. पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अद्यापही मिळालेला नाही. रविवारी साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा दिनालाही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
( हेही वाचा :महापालिकेच्या शिक्षण विभागाला का नको लेखकांच्या साहित्यांचे ऑडीओ बुक्स? )
या भाषांंना अभिजात भाषांचा दर्जा
राज्यात सत्ताबदल झाल्यापासून केंद्र व राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं कठीण असल्याचे दिसत आहे. तसेच, केंद्र सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, मल्याळी, कानडी, तेलुगू आणि ओरिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला.
Join Our WhatsApp Community