गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई केली आहे. येथील कच्छ जिल्ह्यातील गांधी धाममध्ये पोलिसांनी ८० किलोचं कोकेन जप्त केले आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८०० कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे.
एनएआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी किनाऱ्यावरून ८० किलो ड्रग्ज जप्त केले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ८०० कोटी रुपये आहे. पोलिसांना सूत्रांनी यासंदर्भातील माहिती देताच पोलिसांनी या घटनेबाबत शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना समुद्रात अंमली पदार्थांची पाकिटे सापडली. पोलिसांच्या भीतीने तस्करांनी ८० किलो ड्रग्ज बेवारसपणे समुद्रात टाकून पळ काढल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक शोध घेत आहेत.
#WATCH | Gujarat Home Minister Harsh Sanghavi says “Today Gandhidham police seized 80 kgs of cocaine, which is worth about Rs 800 crore in the international market. I have congratulated the DGP and Gandhidham police for this success…” https://t.co/C4RgnwIjgR pic.twitter.com/gkpJS8KqVJ
— ANI (@ANI) September 28, 2023
या घटनेबाबत पोलीस अधीक्षक सागर बागमर यांनी सांगितले की, पोलिसांना ड्रग्जच्या डिलिव्हरीबाबत माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या पथकाने याबाबत अधिक शोध घेतला असता समुद्रकिनाऱ्यावरून कोकेनची ८० पाकिटे जप्त केली. यातील प्रत्येक पाकिटाचे वजन १ किलोग्रॅम इतकं आहे. कच्छ-पूर्व विभागाचे पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितलं की, कदाचित पकडले जाण्याच्या भीतीने तस्करांने बेजबाबदारपणे ड्रग्जची पाकिटे समुद्रात टाकून पळ काढला. पोलीस या घटनेचा अधिक शोध घेत आहेत.
गांधीधाम पोलिसांनी ८० किलो कोकेन जप्त केलं. पोलिसांना या मोठ्या कारवाईत मिळालेल्या यशाबद्दल डीजीपी आणि गांधीधाम पोलिसांचे गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी अभिनंदन केले आहे.
Join Our WhatsApp Community