मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) गुना (Guna) येथे हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) शोभायात्रेवर कर्नलगंज परिसरात मुस्लिम (Muslim) कट्टरपंथींनी हल्ला केला. यावेळी हिंदूवर दगडफेक करण्यात आली असून हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. दि. १२ एप्रिल रोजी संध्याकाळी, मदिना मशिदीजवळील शाहच्या कोल्हू पुरा येथून निघालेल्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्याचे नेतृत्व विक्की खान आणि युसूफ खान यांच्यासह अनेक इस्लामिक कट्टरपंथीयांनी केले होते. (Hindu)
( हेही वाचा : Judge : सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांतील किती न्यायमूर्तींनी जाहीर केली मालमत्ता?)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी बेल्ट आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला, ज्यामध्ये भाजपा नगरसेवक ओम प्रकाश कुशवाह (Om Prakash Kushwaha) यांचा ११ वर्षांचा मुलगा अकुल कुशवाहासह (Akul Kushwaha) अनेक जण जखमी झाले. यादरम्यान, हनुमानाच्या वेशात असलेल्या समर्थ नावाच्या तरुणावर बेल्टने हल्ला करण्यात आला. समर्थ याने सांगितले की, ते लोक मला बेल्टने मारत होते. लाथाबुक्यांनी मला मारहाण केली असून कपडेही फाडण्यात आले. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण तलवार फिरवताना दिसत आहे. हिंदूंवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी विक्की खान आणि युसूफ खानसह (Yusuf Khan) ९ जणांना अटक केली आहे. ओमप्रकाश कुशवाह यांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. (Hindu)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community