गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचे एसटी बँकेवरील संचालकपद रद्द करण्यात आले आहे. ते या पुढे तज्ञ संचालक म्हणून दोघेही एसटी बँकेवर राहू शकणार नाहीत. बँकेच्या सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की आता संचालक मंडळावर आली आहे. या प्रकरणी एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदेंनी तक्रार दाखल केली होती. त्या नुसार आता हा निर्णय घेण्यात आले आहे. (Gunaratna Sadavarte)
एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केलेले पोटनियम आता सदावर्ते यांना रद्द करावे लागणार आहेत तसेच सदावर्ते दाम्पत्याचे संचालक पददेखील रद्द करण्याचा निर्णय सहकारी विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता सदवर्ते दाम्पत्य यापुढे तज्ञ संचालक म्हणून बँकेवर राहू शकणार नाहीत. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी याप्रकरणी सहकार आयुक्तकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का सहकार विभागाने दिला असल्याचे बोलले जात आहे. एस टी महामंडळाच्या बाहेरील लोकांना बँकेच्या संचालक पदावर ठेवण्याचा अधिकार सहकार विभागाने नामंजूर केला असल्याची माहितीदेखील संदीप शिंदे यांनी दिली आहे. (Gunaratna Sadavarte)
(हेही वाचा – IPL 2024, Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहलच्या नावावर टी-२० तील ‘हा’ मोठा विक्रम )
बँकेच्या अहवालावर नथुराम गोडसे यांचा फोटो
सदावर्ते यांच्या पॅनलच्या संचालक मंडळाने यवतमाळमध्ये एसटी कॉपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटप करणे बंधनकारक असताना देखील अहवालाचे वाटप करण्यात आले नव्हते. या अहवालावर नथुराम गोडसे यांचे फोटोदेखील छापण्यात आला होता, असा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले होते.
केवळ मर्जीतील सभासदांना बोलावले
नियमानुसार वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना १४ दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणे आवश्यक असते. मात्र, अशी कोणतीही सूचना संचालक मंडळाकडून सर्व सभासदांना देण्यात आली नव्हती. तर केवळ सदावर्ते यांच्या मर्जीतील सभासदांना बोलवून हवे ते विषय मंजूर करण्यात आले होते, असा आरोप संदीप शिंदे यांनी आपल्या तक्रारीमध्ये सहकार आयुक्तांकडे केला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community