गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान घडलेल्या जाळपोळीसंदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनावेळी घडलेल्या हिंसक घटनांच्या गुन्ह्याचा तपास सीबीआय किंवा तत्सम यंत्रणेकडे वर्ग करण्याची मागणी सदावर्ते यांनी याचिकेत केली आहे.यावर ८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. (Maratha Reservation)
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी २५ऑक्टोबर पासून दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाची हाक दिली. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोलनाविरोधात याचिका दाखल केलीये. मराठा आरक्षणाच्या विरोधात सदावर्ते यांनी यापूर्वीही याचिका केली होती. त्यांच्या याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होतं.
(हेही वाचा : S Jaishankar : वेगळा पॅलेस्टिनी देश निर्माण करणे आवश्यक – एस जयशंकर)
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे यांच्या चिथावणीमुळेच आरक्षण समर्थकांनी हिंसक आंदोलन केले, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेत केला आहे. असे असतानाही त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही. हिंसक आंदोलनावेळी झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसाठी आंदोलनाचे आयोजक मनोज जरांगे यांना जबाबदार धरण्यात यावे. या हिंसक आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थन असल्याचा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेत केला आहे.
हेही पहा –